vaccination in india : करोना लसीकरण मोहीम; १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण होताच विमानतळ, रेल्वे स्टेशवर होणार उद्घोषणा
CoWin वेबसाइटवर १०० कोटी डोस पूर्ण करण्यासाठी काउंटडाउन दिसेल. हे काउंटडाउन #VaccineCentury या नावाने दिसेल. १८ किंवा १८ ऑक्टोबरला लसीकरण मोहीमेत १०० कोटी डोस पूर्ण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील महिन्यापासून आरोग्य मंत्रालयाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त लसीचे डोस असतील. या महिन्यात लसीचे सुमारे २८ कोटी डोस उपलब्ध होतील. ज्यात २२ कोटी Covishield आणि ६ कोटी covaxin असतील, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
Covaxin: २ ते १८ वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’च्या आपात्कालीन वापराला मंजुरी
सुरवातीला शेजारी देशांना करोना लसीचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती करोना लसींच्या निर्यातीबाबत अधिकाऱ्यांनी दिली. भारताने करोनावरील लसीचे डोस नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि इराणला पाठवले आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं.
“भारत करोनावरील लसींचा पुरवठा पूर्ववत करेल, असं पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अलीकडेच सांगितलं होतं. यानुसार आम्ही शेजारी देशांना लसींचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.