पत्रकारांवर अन्याय होणार नाही – पोलीस आयुक्त बैजल
पोलीस आयुक्त बैजल यांचा पत्रकार सुरक्षा समितीवतीने सत्कार
शेळवे /संभाजी वाघुले - सोलापूर चे नूतन पोलीस आयुक्त हरिष बैजल यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त कार्यालयात शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, शहराध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद,सिद्धार्थ भडकुंबे, सतीश गडकरी,रिजवान शेख,इम्तियाज अक्कलकोटकर, इस्माईल शेख, प्रसाद ठक्का, राम हुंडारे, प्रदीप पेदापल्लीवार, श्रीनिवास वंगा, शिवराज मूगळे ,अक्षय रणखांबे, सूर्यकांत व्हनकडे, नागनाथ गणपा,रोहित घोडके आदी पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांवर अन्याय होणार नाही – पोलीस आयुक्त
नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या सत्कार प्रसंगी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सध्या विना चौकशी पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा (भादवी 353)तसेच खंडणीसारखे गुन्हे दाखल होत असून असे गुन्हे दाखल करण्यापूर्वी योग्य ती चौकशी करायला हवी अशी मागणी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे केली असून खोटे गुन्हे दाखल झाल्याने पत्रकारांची बदनामी तसेच मनोबल खचून जात असल्याची भीती व्यक्त केली. त्यावेळी पत्रकारांवर अन्याय होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना दिली.