कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रची निर्मिती – श्रीनिवास करली

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रची निर्मिती – श्रीनिवास करली Progressive Maharashtra was created by Karmaveer Bhaurao Patil – Srinivas karali
रयत शिक्षण संकुलात छोटेखानी कर्मवीर अभिवादन कार्यक्रम
    सोलापूर,१०/०५/२०२१- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यांची प्रगती झाली त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली," असे मत सोलापूर महानगरपालिका सभाग्रह नेता श्रीनिवास करली यांनी व्यक्त केले. 
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास मान्यता, राज्यशासनाचे अभिनंदन
  बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची चौफेर प्रगती व्हावी म्हणून राज्य शासनाने रयत शिक्षण संस्थेस कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ सुरू करण्यास मान्यता दिली आहे.विद्यापीठ प्रभावीपणे ज्ञानदानाचे कार्य करेल आणि संशोधन व गुणवत्ता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचा विश्वास संपादन करण्यात अग्रेसर राहील असा विश्वास संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील यांनी व्यक्त केला.

  सोलापूर महानगरपालिका व रावजी सखाराम हायस्कूल यांच्या वतीने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथी निमित्त सम्राट चौक येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोलापूर म.न.पा. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, प्रभाग नगरसेवक आनंद चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते केतनभाई शहा, लक्ष्मी उद्योग समुहाच्या माधुरीताई पाटील, म.न.पा.उपायुक्त सुनील माने, उद्योजक हर्षल कोठारी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले की कोरोना महामारीचे संकट मानवावर आले आहे, अशा वेळी या संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी प्रबोधनाचे कार्य करत आहेत. ही पुरोगामीत्वाची प्रचिती असून समजास प्रेरणा देणारे कृत्य आहे.

      कोरोंनाचे पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे प्रास्ताविकात वसंत नागणे सरांनी संगितले. आभार संजय जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल कांबळे, शेखर सकट, महावीर आळंदकर, सुनीता पाटील यांनी प्रयत्न केले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: