बैरुत: हिजबुल्लाहच्या आंदोलनावर गोळीबार, सहा ठार


बैरुत: लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मागील वर्षी बंदरात झालेल्या भीषण स्फोटाची धग कमी होण्याची चिन्ह नाहीत. या स्फोट प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीशाला हटवण्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या आंदोलनात झालेल्या गोळीबारात सहा ठार झाल्याचे वृत्त आहे. या आंदोलनाचे नेतृत्व हिजबुल्लाह आणि लेबनॉनमधील एक राजकीय पक्ष करत होते. आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली नाही.

या हल्ल्यामागे सौदी अरेबियाच्या पाठिंबा असलेल्या संघटनेचा हात असल्याचा आरोप इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाहने केला आहे. या गोळीबारामुळे इराण आणि सौदी अरेबियात तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक माध्यमांनी लेबनॉनी सैनिकाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बैरुतमध्ये गुरुवारी झालेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. आंदोलक एका चौकातून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. काही आंदोलकांनी जवळ असलेल्या शस्त्रांनी प्रतिकरा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही वाहनांचे, इमारतीमधील घरांच्या काचांचे नुकसान झाले.

तैवान: १३ मजली इमारतीला भीषण आग, ४६ ठार, अनेक जखमी
या गोळीबाराच्या घटनेशिवाय बैरुतमध्ये दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे लेबनॉनच्या लष्कराने म्हटले आहे. सौदी अरेबिया सरकारच्या जवळची लेबनॉनी फोर्सेस आणि एका राजकीय पक्षाने हा हल्ला केला असल्याचा आरोप हिजबुल्लाह आमि शिया अमल मुव्हमेंट यांनी केला आहे.

पाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे…भीषण स्फोटानंतर उद्धवस्त झाले बेरूत शहर

पाहा: …म्हणून बैरूतमधील स्फोटाने आठवला हिरोशिमावरील अणूबॉम्ब हल्ला!

लेबनॉनचे गृहमंत्री बासम मौलवी यांनी या घटनेचा निषेध केला. स्नाइपर्सने लोकांवर हल्ला केला असल्याची माहिती त्यांनी दिली. हिजबुल्लाहने लोकांना चिथावणी दिली असल्याचाही आरोप त्यांनी केला. तर, राष्ट्रपती मिशेल औन यांनी या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: