‘अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेलच’


हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांचा पत्रकारांशी संवाद
  • संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
  • दसरा मेळावा राजकारणाला दिशा देणारा ठरेल – संजय राऊत

मुंबई: ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर अत्यंत सूचक व खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. (Shiv Sena MP Sanjay Raut on Sambhaji Bhide‘s Statement)

‘भारत हा स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. जगाच्या पाठीवर १८७ देश आहेत. त्यात १ अब्ज २३ कोटी लोकांचा एक देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, परक्यांचा दास्यत्व पत्करत, परक्यांचं खरकटं उष्टं खात राहिलेला निर्लज्ज लोकांचा हा देश आहे, तो म्हणजे भारत,’ असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

वाचा: लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा; सरसंघचालकांची केंद्राला सूचना

भिडे यांच्या या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. ‘आज विजयादशमी आहे. अशा दिवशी शुभ बोललं पाहिजे. अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही. २०२४ मध्ये ते स्पष्ट दिसेल,’ असा टोला राऊत यांनी हाणला. ‘शिवसेना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेच, पण २०२४ नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल. आज लोकसभेत १८ आणि राज्यसभेत ३ मिळून एकूण शिवसेनेचे २१ खासदार संसदेत आहेत. दादरा नगरहवेलीमध्ये कलाबेन डेलकरही निवडून येणार आहेत. त्यानंतर २२ खासदार होतील,’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

वाचा: …तर मी मुख्यमंत्री झालो असतो; छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपुरात बोलताना देशातील अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ड्रग्ज तस्करीचा पैसा देशाच्या विरोधात वापरला जात असेल तर ते चिंताजनक आहे. मोहन भागवत यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण हे सगळं होत असेल तर सरकार काय करतंय? सरकार कोणाचं आहे? नोटाबंदीमुळं काळा पैसा नष्ट होईल, दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तुटेल असं सांगितलं गेलं होतं. पण तसं झालं नाही आणि ते झालं नसेल तर कुठं तरी काहीतरी चुकतंय हे स्पष्ट दिसतंय,’ असं राऊत म्हणाले.

वाचा: LIVE लोकसंख्येचा असमतोल घातक ठरू शकतो – मोहन भागवतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: