सुरज पावले हा युवक अनेकांसाठी ठरतोय तारणहार

सुरज पावले हा युवक पंढरपुरातील अनेकांसाठी ठरतोय तारणहार Suraj Pavle is a savior for many in Pandharpur
 पंढरपूर - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून पंढरपूर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे .त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे . विधानसभेची पोटनिवडणुक पार पडल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना व्हायरसने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन, सिरीयस पेशंट यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना त्यांच्या नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडु लागलेली आहे. ज्या कोरोना पेशंटचा स्कोर वाढलेला आहे, ऑक्सीजन लेव्हल कमी झालेली आहे, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे हे अत्यावश्यक ठरते. काही पेशंटला ऑक्सिजन बेड, काही पेशंटला ऑक्सिजन विथ व्हेंटिलेटर बेडची तातडीने गरज असते. कितीतरी पेशंटना वेळेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड न मिळल्याने आपला जीव गमवावा लागत आहे, हे हृदयद्रावक चित्र पाहुन पंढरपूर शहरातील दाळे गल्ली येथे राहणारे वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष सुरज पावले यांचे मन हेलावुन गेले. आपल्याला शक्य असेल तितक्‍या सिरीयस रुग्णांचे प्राण वाचवण्याकरीता, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याकरीता पावले यांनी उत्स्फुर्तपणे प्रयत्न सुरू केले . 

     बघता-बघता शहरातील अनेक नागरीकांना याचा फायदा झाला. कारण सुरज पावले यांना केवळ एक फोन केला असता सुरज आपल्याला नक्कीच बेड उपलब्ध करून देणार किमान सर्वोतपरी प्रयत्न तर नक्कीच करणार याची खात्री होती. केवळ पंढरपूर शहरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील हॉस्पिटलमधील बेड वेळेत उपलब्ध करून देत अनेक नागरिकांचे जीव वाचवण्याचे महत्कार्य काम सुरज हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने करत आहेत. ज्यांना ज्यांना याकामी सुरज यांचे सहकार्य लाभलेले आहे, ते सर्वजण आम्ही तुमच्याप्रती सदैव, आयुष्यभर ऋणी राहु अशी भावना सुरज यांना प्रत्यक्ष भेटुन, फोन करून व्यक्त करत आहेत.

   याबाबत सुरज पावले यांचेबरोबर चर्चा केली असता ते म्हणाले, कुठल्याही रोगाच्या व्हायरस पेक्षा 'समाजातील आत्मकेंद्रित वृत्ती' हा सर्वात भयानक व्हायरस आहे. 'संकुचित स्वभाव' हा कोरोनापेक्षाही भयानक रोग आहे.

 कसलाही भेदभाव न करता, सर्वांनाच मदतीचा प्रकाश देणारा सुरज.... हा जीवघेण्या संकटात सापडलेल्या नागरीकांसाठी निश्चितच तारणहार ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: