पोस्ट ऑफिसची हटके स्कीम; एकदा गुंतवा अन् प्रत्येक महिन्याला कमाई करा


हायलाइट्स:

  • गुंतवणूकदार श्रीमंत होत आहेत, पण ही तेजी कायम राहील की नाही यावर विश्वास ठेवता येत नाही.
  • ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, त्यांच्यासाठी अशा अनेक सरकारी योजना आहेत.
  • ज्यात तुम्ही पैसे गुंतवून दरमहा परतावा मिळवू शकता.

मुंबई : आजकाल शेअर बाजार दररोज नवनवे विक्रम मोडत आहे. गुंतवणूकदार श्रीमंत होत आहेत, पण ही तेजी कायम राहील की नाही यावर विश्वास ठेवता येत नाही. म्हणून, ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, त्यांच्यासाठी अशा अनेक सरकारी योजना आहेत, ज्यात पैसे फक्त सुरक्षित राहणार नाही, तर चांगला परतावादेखील देत आहे. दीर्घकालीन, अल्पकालीन तसेच मासिक उत्पन्न असलेल्या योजनाही आहेत, ज्यात तुम्ही पैसे गुंतवून दरमहा परतावा मिळवू शकता.

पेमेंट करणं झालं सोप्प; फोन पे, एसबीआय आणि ICICIमध्ये सेट करा ऑटो-पे
दरमहा उत्पन्नाच्या योजनांचा पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेत (स्मॉल सेव्हिंग स्कीम) समावेश आहे. या योजनांद्वारे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात एक निश्चित रक्कम येईल. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून दरमहा उत्पन्न देणाऱ्या योजनेचे नाव आहे राष्ट्रीय मासिक उत्पन्न बचत योजना (National Savings Monthly Income Account- MIS). या योजनेमध्ये तुम्हाला ६.६ टक्के दराने व्याज मिळते. दरमहा तुम्हाला व्याज दिले जाईल.
वैयक्तिक कर्ज घेताय ; ‘या’ कंपनीने सुरु केलं डिजीटल कर्ज, फोनवर होणार उपलब्ध
किती पैसे जमा करू शकता

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in नुसार, तुम्ही राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खात्यात किमान १००० ते जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये जमा करू शकता. जर तुमचे संयुक्त खाते असेल, तर गुंतवणुकीची जास्तीत जास्त रक्कम ९ लाख रुपयांपर्यंत वाढते.

गुंतवणुकीची रक्कम
या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये १००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एकाच खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम ४.५ लाख आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपये आहे. कोणतीही व्यक्ती या योजनेत जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये गुंतवू शकते. (यात संयुक्त खात्यातील व्यक्तीचा वाटा देखील समाविष्ट आहे.) प्रत्येक संयुक्त खातेधारकाला संयुक्त खात्यात समान वाटा असेल.

तरुणाई बिटकॉइन, OTT च्या आहारी; सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता, केली ही मागणी
पाच वर्षांत मॅच्युरिटी
पोस्ट ऑफिसमधील मासिक उत्पन्न खात्याची परिपक्वता (मॅच्युरिटी) ५ वर्ष असते. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते बंद करता येते. खात्याच्या परिपक्वतापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास ती रक्कम खातेदाराच्या नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. मॅच्युरिटी झाल्यानंतर खाते बंद करण्यासाठी खातेधारकाला एक आवेदनपत्र भरून ते पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागते. यात एक वर्षाचा लॉक-इन कालावधी आहे. खाते उघडल्याच्या एका वर्षाच्या आत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी हे खाते बंद केले, तर तुमच्या खात्यातून २ टक्के रक्कम कापली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल. जर तीन वर्षांनंतर खाते बंद केले, तर ही कपातीची रक्कम एक टक्के असेल. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय पोस्ट www.indiapost.gov.in च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *