योग्य वेळी,योग्य उपचार,प्रसन्न व सकारात्मक मन हीच कोरोनाशी लढण्याची गुरुकिल्ली – नगरसेवक विवेक परदेशी

योग्य वेळी,योग्य उपचार,प्रसन्न व सकारात्मक मन हीच कोरोनाशी लढण्याची गुरुकिल्ली – नगरसेवक विवेक परदेशी At right time,with right treatment, a happy and positive mind is the key to fighting corona – Corporator Vivek Pardeshi
   पंढरपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण पाहत आहोत की बरेच नागरिक कोरोना झाला हे कळताच घाबरुन जात आहेत,स्वतःची व आपल्या परिवाराच्या काळजीने गंभीर होत आहेत.पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांच्या मानसिकतेमध्ये हा फरक आहे.बाहेरुन खूप बलवान वाटतात पण आतून मनात भिती वाढतच असते.घाबरण्यासारखे काही नसतानाही नागरिक खूप घाबरत आहेत.आपण कोरोनाचे नियम, शासनाच्या सुचना तंतोतंत पालन केल्यास,कोरोना चाचणी,डॉक्टरांच्या सुचनेने औषध उपचार घेतल्यास आपण १००% बरे होणार, सुरक्षित राहणार हे माहीत असतानाही नागरिक प्रमाणापेक्षा जास्त घाबरुन जात आहेत. स्वतःला त्रास करुन घेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे सौम्य त्रास असुनही,एचआर सिटी स्कोर खूप जास्त नसतानाही नागरिकांना जास्त त्रास होत आहे,गरज नसतानाही जास्त उपचार घ्यावे लागत आहेत व काही वेळा जिवावरही बेतत आहे.
शांतपणे विचार विनमय करून निर्णय घ्यावा
   घाबरून कोरोनावर मात करता येणार नाही हे सिद्धच आहे,हे आपण सर्वजण समजून घेऊन, सर्वांना समजून सांगितले पाहिजे. काही वेळा आपण स्वतः गोंधळून जातो. कधीही, कोणताही प्रसंग उद्भवला तर पहिल्यांदा आपण मनाने धिट रहायला पाहीजे, गोंधळुन जायला नको, टेंशन घ्यायला नको, धिर धरला पाहिजे, अती घाई करु नये. नेमके काय करावे याचा आपण, आपल्या घरातील व्यक्ती, आपल्या मदतीला धावणारे मित्र यांच्यामध्ये शांतपणे विचार विनमय करून निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी फॅमिली डॉक्टर,तज्ञ व्यक्ती यांचा सल्ला आपण घेतला पाहिजे.
त्यांचे मनोबल वाढवले तर अशा मदतीचे मोल करता येणार नाही
  प्रत्येक वेळी पैशाची मदत,वस्तुची मदत काम करेलच असे नाही. आपण एखाद्याला धिर दिला, त्यांचे मनोबल वाढवले तर अशा मदतीचे मोल करता येणार नाही. अशी मदत सदर व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनमोल ठरु शकते. ज्या व्यक्ती घाबरलेल्या आहेत अशा व्यक्तींना धिर देणे महत्त्वाचे आहे.वेळीच आपण अशा नागरिकांचा,त्यांच्या परिवाराचा,आपल्या मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढल्यास मला खात्री आहे कोरोनाचा रिकव्हरीचा दर वाढेल. आपण सर्वजण मिळून अशा प्रकारे मदत करायची आहे. आपले मित्र परिवार,शेजारी किंवा कोणालाही कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना चांगल्या मनाने, न घाबरता त्यांना धिर देऊ, आपला चेहऱ्यावरील हावभाव बघुत ती व्यक्ती खचुन जाणार नाही याची काळजी आपण घेऊ, सर्व जण बाधीत झाले असल्यास १४ दिवस सुरक्षीत अंतर ठेऊन जेवण पोहचवु तसेच आपणास शक्य असेल ती मदत करु. हे काम खुप पुंण्याचे असून असे पेशंट लवकरात लवकर बरे होतील व कळत न कळत आपल्या हातून चांगले मदत कार्य घडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: