IPL 2021 CSK and KKR Final Playing xi: आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी चेन्नई-कोलकाताने कोणत्या खेळाडूंना दिली संधी, जाणून घ्या


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स टॉस जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. या सामन्यासाठी केकेआर संघाने कोणताही बदल केलेला नाही. तर धोनीने देखील या मेगा फायनल सामन्यात कोणताही बदल केलेला नाही.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही

वाचा- आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार; धोनी ठरणार जगातील पहिला…

याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने साखळी फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात १५६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात या मैदानावर झालेल्या १२ पैकी ९ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुबईची खेळपट्टी थोडी धिमी असली तरी ती फलंदाजीसाठी चांगली आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १५२ इतकी आहे. दुबईचे हवामान गरम असल्याने पण खेळाडू गेल्या काही दिवासांपासून तेथे असल्याने याचा फार फटका बसणार नाही.

चेन्नईने क्वालिफायल १ मध्ये दिल्ली विरुद्ध झालेल्या लढतीत संघात कोणताही बदल केलेला नाही. धोनीने या अंतिम सामन्यात संघातील सर्वात अनुभवी खेळाडू सुरेश रैनाच्या जागी रॉबिन उथप्पावर विश्वास दाखवला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावले होते.

असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ-
फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर, जोश हेजलवुड


असा आहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ-

शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, सुनिल नरेन, लॉकी फग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्तीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: