chhattisgarh : जशपूरमध्ये कारने अनेकांना चिरडले, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया…
जशपूर: छत्तीसगडच्या जशपूरमध्ये दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका कार चालकाने अनेकांना चिरडले. या घटनेबाबत मिळालेल्या अपडेट माहितीनुसार यात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झालेत. या प्रकरणी मुख्यमंत्री भूपेश बघेल ( cm bhupesh baghel ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जशपूरची घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचं ते म्हणाले. दोषींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी दोषी दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
जशपूरमध्ये नागरिकांना कारने चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुर्गा देवी विसर्जनाची मिरवणुकीवेळी भरधाव कार नागरिकांना चिरडत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसतंय.
कारने चिरडल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते छत्तीसगडहून जात होते. आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती जशपूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.