CSK vs KKR Final : चेन्नईने संधीचे सोने करत उभारली मोठी धावसंख्या, जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर


दुबई : फायनलमध्ये कशी फलंदाजी करायची याचा उत्तम वस्तुपाठ चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज दाखवून दिला. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर प्रहार करत चेन्नईने मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता जेतेपदापासून ते फक्त एकच पाऊल दूर असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये केकेआरने प्रथम गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येत गुंडाळले होते. पण या सामन्यात प्रथम फलंदाजीची चेन्नईला संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. फॅफ ड्यु प्लेसिसच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने फायनलमध्ये केकेआरपुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले.

कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर चेन्नईला त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. या संधीचा चांगलाच फायदा चेन्नईच्या संघाने उचलला. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यु प्लेसिस यावेळी कोलकाताच्या गोलंदाजांवर तुटून पडले. ऋतुराजने यावेळी ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३२ धावा केल्या, त्याचबरोबर ऋतुराजने यावेळी या हंगामातील सर्वाधिक धावांचा विक्रमही केला. ऋतुराज बाद झाला असला तरी फॅफ ड्यु प्लेसिसने अर्धशतक झळकावत केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजनंतर फॅफला रॉबिन उथप्पाची चांगली साथ मिळाली. उथप्पाने यावेळी फक्त १५ चेंडूंत तीन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची आक्रमक खेळी साकारली आणि त्यामुळेच चेन्नईच्या संघाला धावगती वाढवण्यात चांगलेच यश मिळाले. पण सुनिन नरिनने यावेळी चेन्नईच्या संघाला दुसरा धक्का दिला आणि उथप्पालाही बाद केले. पण उथप्पा बाद झाल्यावरही फॅफने आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवत केकेआरच्या गोलंदाजीवर तो प्रहार करत राहीला. उथप्पा बाद झाल्यावर मोइन अली फलंदाजीला आला आणि त्यानेही स्थिरस्थावर झाल्यावर फॅफला चांगली साथ दिली.

केकेआरच्या संघाने गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये केकेआरचा संघ यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे फायनलमध्येही त्यांनी तीच गोष्ट करायचे ठरवले आणि चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी त्यांनी दिली. पण चेन्नईच्या संघाने या संधीचे सोने केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: