‘जरा इतिहास वाचा…’; संघावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर पाटलांचा पलटवार


हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरेंची संघ आणि भाजपवर टीका
  • चंद्रकांत पाटलांनी दिलं जोरदार उत्तर
  • आणीबाणीवरून शिवसेनेला विचारला बोचरा सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आजच्या भाषणावर तिरकस शब्दांत निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यलढ्यात हे लोक कुठे होते? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे जे म्हणाले ते चिंताजनक आहे. स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होता? तुमचा तर जन्मच झाला नव्हता पण शिवसेना तरी कुठे होती? १९२५ साली जेव्हा संघाची स्थापना झाली त्यानंतर तत्कालीन सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढा प्रखर झाल्यानंतर या लढ्यासाठी काही काळ संघ स्थगित केला होता आणि स्वयंसेवकांना आवाहन केलं की मी आता स्वत: स्वातंत्र्यलढ्यात उतरणार आहे, तुम्हीही उतरा. मुळात डॉ. हेडगेवार हे चांगले स्वातंत्र्यसैनिक होते, क्रांतीकारी होते. त्यामुळे तुम्ही जरा इतिहास वाचा,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

Uddhav Thackeray: ड्रग्ज प्रकरणावर उद्धव ठाकरे प्रथमच बोलले; मुंद्रा पोर्टचा उल्लेख करत म्हणाले…

आणीबाणीवरून शिवसेनेला बोचरा सवाल

‘आणीबाणीत शिवसेना कुठे होती? आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी यांनी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. हजारो पत्रकार तुरुंगात गेले, लाखो स्वयंसेवक तुरुंगात गेले. मात्र तुम्ही तर आणीबाणीत इंदिरा गांधी यांच्याशी तडजोडच केली होती,’ असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे. तसंच शिवस्मारक आणि इतरही मुद्द्यांवरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना या पक्षांत जवळीक वाढणार का, अशी चर्चा रंगत होती. मात्र आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेली खरमरीत टीका आण त्याला भाजपनं दिलेलं प्रत्युत्तर यामुळे या दोन पक्षांतील अंतर वाढल्याचंच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिवसेना संघर्ष नेमका कुठपर्यंत जाऊन थांबतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: