धोनीचीचं पोरं हुश्शार… चेन्नईच चॅम्पियन्स, केकेआरवर मात करत पटकावले चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद


दुबई : चॅम्पियन्स संघ कसा असतो, याचा उत्तम वस्तुपाठ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आजच्या फायनलमध्ये दाखवून दिला. धडाकेबाज फलंदाजी करत चेन्नईने या अंतिम फेरीत कोलकाता नाइट रायडर्सपुढे १९३ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी आपील भूमिका चोख बजावली आणि कोलकातावर २७ धावांनी विजय मिळवत संघाला चौथ्यांदा जेतेपद जिंकवून दिले.

चेन्नईच्या १९३ धावांचा पाठलाग करताना केकेआरच्या वेंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी केकेआरला दमदार सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाचे अर्धशतक पूर्ण केले होते. वेंकटेश यावेळी गिलपेक्षा आक्रमक फटकेबाजी करत होता. वेंकटेशने यावेळी अर्धशतकही साकारले, पण त्यानंतर मात्र तो मोठी खेळी साकारू शकला नाही. वेंकटेशला शार्दुल ठाकूरने बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला, वेंकटेशने यावेळी पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. वेंकटेश बाद झाल्यावर गिलनेही आपले अर्धशतक साजरे केले, पण त्यानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. गिलने सहा चौकारांच्या जोरावर ५० धावा केल्या. गिल बाद झाला आणि केकेआरचा डाव गडगडला. गिल बाद झाल्यावर चेन्नईचा विजय होणार, हे स्पष्ट झाले होते.

चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यु प्लेसिस यावेळी कोलकाताच्या गोलंदाजांवर तुटून पडले. ऋतुराजने यावेळी ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३२ धावा केल्या, त्याचबरोबर ऋतुराजने यावेळी या हंगामातील सर्वाधिक धावांचा विक्रमही केला. ऋतुराज बाद झाला असला तरी फॅफ ड्यु प्लेसिसने अर्धशतक झळकावत केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजनंतर फॅफला रॉबिन उथप्पाची चांगली साथ मिळाली. उथप्पाने यावेळी फक्त १५ चेंडूंत तीन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची आक्रमक खेळी साकारली आणि त्यामुळेच चेन्नईच्या संघाला धावगती वाढवण्यात चांगलेच यश मिळाले. पण सुनिन नरिनने यावेळी चेन्नईच्या संघाला दुसरा धक्का दिला आणि उथप्पालाही बाद केले. पण उथप्पा बाद झाल्यावरही फॅफने आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवत केकेआरच्या गोलंदाजीवर तो प्रहार करत राहीला. उथप्पा बाद झाल्यावर मोइन अली फलंदाजीला आला आणि त्यानेही स्थिरस्थावर झाल्यावर फॅफला चांगली साथ दिली. फॅफ यावेळी २०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला, फॅफने यावेळी ५९ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ८६ धावा केल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: