Video : रणवीर सिंगच्या अवतारात दिसले कपिल देव; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही


मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा आपल्या हटक्या स्टाईलमुळे ओळखला जातो. अनेकवेळा त्याचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. चाहत्यांपासून ते रणवीर सिंगची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांना असं वाटतं की, बॉलिवूडचा हा स्टार काहीही परिधान करू शकतो. याच्या अगदी उलट आहेत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव. भारताला विश्वविजेता बनविणारा हा खेळाडू नेहमी नीटनेटक्या कपड्यांमध्ये दिसतो. कपिल देव कधी रणवीर सिंगच्या स्टाईलमध्ये दिसतील, असा विचारही कुणी केला नसेल, पण क्रेडची नवी जाहिरात पाहिल्यावर तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही

कपिल देव या जाहिरातीत रणवीर सिंगच्या भूमिकेत दिसून येत आहेत, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीही आपले हसणे रोखू शकणार नाही. कपिल देव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही जाहिरात शेअर करताच काही मिनिटांत ती व्हायरल झाली आहे.

वाचा- सामना सुरू होताच पाहिल्या पाच मिनिटात कळणार IPLचा विजेता; जाणून घ्या कारण…

कपिल देव यांच्या अतरंगी अवताराला चाहत्यांची पसंती
हा व्हिडिओ शेअर करताना कपिल देव यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ”हेड्स – मी फॅशनेबल आहे. टेल्स – मी अजूनही फॅशनेबल आहे.” या व्हिडिओमध्ये कपिल देव यांनी कसोटी सामन्यात गुलाबी कपडे परिधान केले आहेत. तर क्षेत्ररक्षण करताना ते लांब जॅकेट आणि विचित्र लूकमध्ये दिसत आहेत. चाहत्यांची जोरदार पसंती या व्हिडिओला मिळताना दिसत आहे.

वाचा- IPL फायनल: कोणाचे पारडे जड? असे आहे पिच, हवामान आणि रेकॉर्ड

रणवीर सिंगही त्याच्या आगामी चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्याच्या नवीन चित्रपटाची कथा ‘८३’ १९८३ च्या विश्वचषकाभोवती फिरते. हा विश्वचषक भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. याशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोणची छोटी भूमिका आहे, ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका करताना दिसेल. त्याचबरोबर पंकज त्रिपाठी, आर बद्री, एमी विर्क, साहिल खट्टर, निशांत दहिया, दिनकर शर्मा, चिराग पाटील, ताहिर राज भसीन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.

वाचा- चेन्नईने २०० धावा केल्या तरी विजयाची हमी नाही; KKR देऊ शकतो मोठा धक्काSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: