हे चाललंय काय? उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर जीवघेणा हल्ला


हायलाइट्स:

  • उल्हासनगरमध्ये पोलिसावर हल्ला
  • पोलिसावर केले चाकूने वार
  • पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणेः महाराष्ट्रात गुन्हेगारी घटनांचे सत्र वाढत असल्याचं चित्र असतानाच आता पोलिसांवरच हल्ले होत असल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय शितलामी आणि नरेश लेफ्टी यांच्यात पैशांवरुन वादावादी सुरू होती. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यावेळी अविनाश नायडू याने संजयकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संजय आणि अविनाश नरेशला भेटले. या वेळी दोन्ही गटांत बाचाबाची झाली. यावेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड गस्तीवर होते. त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला.

वाचाः १८४ कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार; सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा

मात्र, नरेश आणि त्याच्या साथीदाराने पोलिसांवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच, संजय शितलानी आणि अविनाश यांच्यावरही हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गंभीर दुखापत या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

वाचाः रविवारी लोकल प्रवास करताय?; वाचा ही महत्त्वाची बातमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: