Coronavirus In Ahmednagar करोना: राज्याची चिंता वाढवणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातून मोठा दिलासा


हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी.
  • दैनंदिन करोना रुग्णांची संख्या तीनशेच्या खाली.
  • निर्बंध कडक केल्यानंतर स्थितीत होतेय सुधारणा.

अहमदनगर :करोना रुग्णांच्या बाबतीत राज्यभरासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आज दिलासादायक चित्र पहायला मिळाले. दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या प्रथमच तीनशेच्या आत आली. गेल्या चोवीस तासांत २५८ नवे रुग्ण नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे चिंता वाढविणाऱ्या तालुक्यांची रुग्णसंख्याही पन्नासच्या आत आली आहे. असे असले तरी राहाता तालुक्यातील रुग्णसंख्या विचारात घेता शिर्डी येथील दर्शन व्यवस्थेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढेही ऑनलाइन पास काढलेल्यांना दर्शन मिळणार आहे. ( Coronavirus In Ahmednagar Latest Update )

वाचा: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मी सक्ती केली!; पवार फडणवीसांना म्हणाले…

दुसऱ्या लाटेनंतर दीर्घकाळ नगरमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे या महिन्यात कडक उपाय योजना हाती घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ६९ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर आढावा घेऊन त्यातील आठ ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र कायम ठेवले तर २१ गावांत नव्याने लॉकडाऊन करण्यात आला. तो अद्यापही सुरू आहे. जिल्ह्यात संगमनेर, पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक होती. दीर्घकाळ तेथे रुग्णसंख्या शंभरच्यावर राहिली. त्यानंतर राहाता तालुक्यातील रुग्णसंख्याही वाढली. आज मात्र सर्वच ठिकाणी दिलासादायक चित्र पहायला मिळाले. संगमनेर तालुक्यात ४९, पारनेर ३७, राहाता ३२ तर श्रीगोंद्यात २२ रुग्ण आढळून आले. नगर शहरात १६ रुग्ण आढळले. नगर तालुका, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर या तालुक्यांत तर एक अंकीच रुग्ण आढळून आले. मागील काही कालावधीत रुग्णसंख्येत चढउतार होत असल्याचे आढळून आले होते. मात्र, एवढ्या खाली हा अकडा प्रथमच आला आहे. आता त्यातील घसरण कायम राहते की नाही, यावर पुढील गोष्टी अलंबून आहेत.

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

शिर्डीत दर्शन व्यवस्था सुरू करताना रुग्णसंख्या कमी झाल्यावर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मात्र, शिर्डी ज्या राहाता तालुक्यात येते, तेथे तुलनात्मकदृष्टया अद्यापही जास्त रुग्ण असल्याने शिर्डीच्या दर्शन व्यवस्थेत तूर्त तरी कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन ऑनलाइन पास पद्धतीने करण्यात आले आहे. प्रसादालयही बंद ठेवण्यात आले आहे. रूग्णसंख्येचा आढावा घेऊन यात वेळोवेळी बदल करण्यात येणार होता. राहाता तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता भाविकांसाठी तूर्तास दर्शन व्यवस्था ऑनलाइन पास पद्धतीनेच राहील. भाविकांसाठी प्रसादालयही बंद राहील. सध्या जिल्ह्यातील २१ खेड्यांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर ८ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी सावळी विहीर ते शिर्डीपर्यंत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत,’ असेही भोसले यांनी सांगितले.

वाचा: ‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत, त्यामुळेच…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: