हमदर्दी रखा करो दोस्तों जानवरों के प्रती,ये बिना लफ्जों के दिल से दुवा देते है…

हमदर्दी रखा करो दोस्तों, जानवरों के प्रती,ये बिना लफ्जों के दिल से दुवा देते है…
Keep sympathy friends, animals, they offer prayers from the heart without any worries

अकलूज -कोरोना महामारीची दूसरी लाट आणि या लाटेमुळे लावलेल्या लाँकडाउन आणि सध्या सुरु असलेल्या कडक उन्हाळाच्या झळा मानवा बरोबरच प्राणी पक्ष्यानाही बसु लागल्या आहेत. मानवास बोलता येते ते बोलून मागून अन्न – पाणी मिळवतील. पण प्राणी पक्ष्यांनी काय करायचे? ते अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. त्यांची अन्न पाण्याची भटकंती थांबवी म्हणून भगवान महावीर यांच्या जिओ और जीने दो च्या संस्काराने चालत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री सन्मती सेवा दल आता पुढे सरसावले आहे.

श्री सन्मती सेवा दलामार्फ़त महाळुंग गावातील माकडांना अन्न फळे देण्यात येत आहेत. कडक उन्हाळा व लॉकडाउनमुळे माणसांची वर्दळ नसल्याने माकडांची उपासमार होत असल्याची माहिती स्थानिकांकडून समजली त्यामुळे श्री सन्मती सेवा दला मार्फ़त सर्वतोपरी अन्न संकलित करण्याचा प्रयत्न होत आहे. 

   सन्मती सेवा दलाच्यावतीने सर्व नागरिकांना  आवाहन करण्यात येत आहे जर आपल्याकडे शेतात सोडून दिलेले केळी,टोमॅटो ,कलिंगड, खरबूज,काकडी व इतर खाण्याचे पदार्थ असतील तर आम्हाला कळवा आम्ही ते अन्न त्या प्राण्या पर्यंत पोहचवू 

शिवराम सेवा संघटनेचे कार्यकर्ते हरिभाऊ साबळे, रामा धंगेकर यांनी महाळुंग येथील माकडांची अन्ना साठीची भटकंती थांबावी म्हणून केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत श्री सन्मती सेवा दल संस्थेचे भिगवण येथील कार्यकर्ते पराग गांधी, पंकज दोशी,नितीन दोशी,अभिनंदन दोशी, तीर्थंकर दोशी,स्वप्नील गांधी, अमोल शहा यांच्या कडून २५० किलो केळी,बिस्कीट २ बाॅक्स, शेंगदाणे १० कि., खारमुरे, फुटाणे देण्यात आले.

  यावेळी मिहीर गांधी,महावीर शहा,मयुर गांधी, सारंग शहा,राजेंद्र भोसले (Rpi अध्यक्ष) नाना भोसले, कुमार चव्हाण महाळुंग आदी उपस्थित होते.

महाळुंग ता.माळशिरस जि.सोलापूर हे गाव अकलूजपासून ८ किमी अंतरावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: