navjot singh sidhu : पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम; सिद्धूंचे सोनिया गांधींना पत्र, भेटीसाठी वेळ मागितली


नवी दिल्लीःनवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट ( navjot singh sidhu writes letter to sonia gandhi ) घेतली होती. या भेटीनंतर पंजाब काँग्रेसमधील वाद मिटल्याचं बोललं जात होतं. पण पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सिद्धू्ंना आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा पत्र लिहिले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात १३ मुद्दे मांडले आहेत. पवित्र ग्रंथाचा अवमान, अंमली पदार्थ आणि दारू माफियांसह १३ मुद्द्यांचा उल्लेख सिद्धू यांनी पत्रात केला आहे. पंजाबह सरकारने या मुद्द्यांवर काम करावं, अशी मागणी त्यांनी सोनिया गांधींकडे पत्रातून केली आहे. सिद्धू यांनी या १३ मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीनुसार सरकारवर लक्ष ठेवण्याचं आपलं काम आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सरकारमध्ये दलित समाजाचा आवाज बळकट करण्यासाठी एका दलिताला मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. पण असं असूनही त्यांना राज्यात समान स्थान मिळालेले नाही. प्रत्येक धार्माच्या समाजाच्या किमान एका सदस्याला चन्नी मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे. याशिवाय दोआबा क्षेत्रातून आणि मागास प्रवर्गातून दोन मंत्री बनवावेत, असं सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राहुल गांधींना भेटूनही नाराजी दूर झालेल्या नसल्याचं सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या या पत्रावरून स्पष्ट होतंय. आणि म्हणूनच त्यांनी आता एक नवीन युक्ती लढवली आहे.

speeding car rams into durga procession : विसर्जन मिरवणुकीत भारधाव रिवर्स कार घुसली, अनेक जण जखमी

राहुल गांधींना भेटून राजीनाम्यावर घेतला निर्णय

सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर नवज्योत सिंग सिद्धू यांनी राहुल गांधींची यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी भेट घेतली होती. या बैठकीनंतर सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत, पदावर कायम राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.

सिंघु सीमेवर हत्या: आरोपी सरबजीत सिंहला सात दिवसांची पोलीस कोठडीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: