अखेर करकंब ग्रामपंचायतीने घेतली दखल,स्मशानभूमीतील कामे होण्यास झाली सुरुवात
अखेर करकंब ग्रामपंचायतीने घेतली दखल,
स्मशानभूमीतील कामे होण्यास झाली सुरुवात

करकंब /मनोज पवार - करकंब ता. पंढरपूर येथील स्मशानभूमीतील गैरसोयीबद्दल करकंब ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देऊनसुद्धा कुठलीच दखल घेतली जात नव्हती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पंढरपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना गेल्या काही दिवसापूर्वी करकंबमधील स्मशानभूमीतील त्वरित कामे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करकंब ग्रामपंचायतीपुढे आंदोलन करून टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत ज्ञान प्रवाह न्यूज मध्ये बातमी देण्यात आली होती.यानंतर करकंब ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन करकंब ग्रामपंचायतीच्या स्मशान भूमीतील बाभळी व काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती ती सर्व काढुन साफसफाई करून स्वच्छता करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकंदरीत काही प्रमाणात तरी लोकांच्या अडचणी दूर होणार आहेत.

स्मशानभूमीतील काटेरी झाडे झुडपे काढून सर्व स्वच्छता व्यवस्थितपणे केलेली आहे. लाईटही चालू केलेल्या आहेत त्यामुळे आता लोकांना अडचण येणार नाही व लवकरात लवकर आरसीसी पाण्याची टाकी बांधून तीही लोकांची गैरसोय दूर करण्यात येईल –
आदिनाथ देशमुख ,उपसरपंच करकंब