किंग इज बॅक; कोणाला वाटले नव्हते तो पुन्हा येईल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीला सुरूवात झाली आहे. मुख्य स्पर्धा २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारत पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार असून पहिली लढत इंग्लंडविरुद्ध तर दुसरी लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. आयपीएल झाल्यानंतर भारतीय खेळाडू वर्ल्डकपसाठी एकत्र आले आहेत. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये एक नवा सदस्य होता. त्याचे स्वागत बीसीसीआयने केले.

वाचा- या पाच अटी पूर्ण केल्यानंतरच राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय खेळाडूंची नावे जाहीर करताना बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले. धोनी रविवारी भारतीय संघासोबत दाखल झाला. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामात धोनीच्या नेतृत्ववाखाली चेन्नई सुपर किंग्जने चौथे विजेतेपद मिळवले.

वाचा- Video: कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला; ऋतुराजने CSKला लावला मराठी

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर श्रीधर यांच्या सोबत धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना किंग क्राउन महेंद्र सिंह धोनी नव्या भूमिकेत भारतीय संघात जोरदार स्वागत.

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या धोनीने या कामासाठी पैसे घेतेल नाहीत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात धोनी सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे त्यानंतर २०११ साली वनडे वर्ल्सकपचे विजेतेपद मिळवले होते. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या शिवाय आयपीएलमध्ये चेन्नईने संघाने त्याच्या नेतृत्वाखाली ९ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि ४ विजेतेपद मिळवली आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: