IMD Alert: केरळ, दिल्ली, उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ; सतर्कतेचा इशारा


हायलाइट्स:

  • केरळमध्ये एनडीआरफकडून बचाव आणि मदत कार्य सुरू
  • उत्तराखंडात तीन पुढचे दोन दिवस रेड अलर्ट
  • मध्य प्रदेशात काही ठिकाणी विजांसहीत पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली : रविवारपासून केरळमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच भारताच्या उत्तरेकडे दिल्ली, उत्तराखंडातही पावसानं जोरदार हजेरी लावलीय. उत्तराखंडात तीन पुढचे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरयाणातही पुढचे दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. अरबी सागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं केरळसहीत दक्षिण भारतातील काही राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

केरळमध्ये २६ जणांचा मृत्यू

केरळमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या दिसून येत आहेत. तसंच अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उत्पन्न झालीय. केवळ कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर केरळमध्ये वेगवेगळ्या घटनांत २६ जणांनी आपले प्राण गमावले. एनडीआरफकडून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलंय. तसंच यासाठी तिन्ही सेनादलांकडून मदत घेण्यात येतंय. हवामान विभागाकडून कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, पथनामथिट्टा आणि त्रिशूर सहीत १२ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Kerala Rains : केरळमध्ये पावसाने हाहाःकार, २१ जणांचा मृत्यू; ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट
kerala rains : केरळला परतीच्या पावसाचा जबर तडाखा; ९ जणांचा मृत्यू, ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट
उत्तराखंडात अलर्ट

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा रोखण्यात आलीय. उत्तराखंडात भूस्खलन आणि नद्यांजवळच्या भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सावधानता म्हणून बद्रीनाथ धामकडे जाणाऱ्या प्रवाशांना रोखण्यात येतंय. सरकारकडून प्रशासन आणि एसडीआरएफला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तराखंडात १८ ऑक्टोबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलीय. सोबतच एसडीआरएफच्या २९ टीम्सना प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठवण्यात आलंय.


हरयाणा, उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार, उत्तर प्रदेशच्या हाथरस, अलीगढ, आग्रा, देवबंद, नजीबाबाद, मुजफ्फरनगर, बिजनौर, हस्तीनापूर, चांदपूर, मेरठ, हापूड, किठौर, मुरादाबाद, अमरोहा आणि आजूबाजूच्या भागांत १८ ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर हरयाणाच्या पलवल, औरंगाबाद, फरीदाबाद, वल्लभगढ तसंच राजस्थानच्या टुंडला, भरतपूर, नागर आणि जवळपासच्या भागांत काही तास पावसाची शक्यता आहे.

या राज्यांनाही सावधानतेचा इशारा

हवामान विभागाकडून जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेशापर्यंत तसंच मध्य प्रदेश ते ओडिशापर्यंत पुढच्या ४८ तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील काही भागांत विजांसहीत पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं इथे ‘येलो अलर्ट‘ जारी करण्यात आलाय. भोपाळ, जबलपूर, होशंगाबाद आणि शहडोल जिल्ह्यांत नागरिकांना अधिक सतर्क राहण्यास बजावण्यात आलंय.

capt jayant joshi : अखेर ७५ दिवसांनी सापडला पायलट जयंत जोशींचा मृतदेह; लष्कर, नौदलाचे अथक प्रयत्न कामी
kulgam terror attack : काश्मीरमध्ये बिहारच्या मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; दोन ठार, तर एक जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: