टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक पराभव; पाहा भारतीय संघावर काय परिणाम होणार


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी स्पर्धेत एका धक्कादायक विजयाची नोंद झाली आहे. पात्रता फेरीतील ग्रुप बी मधील लढतीत स्कॉटलंडने बांगलादेशचा ६ धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्कॉटलंडने २० षटकात ९ बाद १४० धावा केल्या. क्रिस ग्रीव्सने २८ चेंडूत ४५ धावा केल्या. उत्तरा दाखल बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ धावा करता आल्या. मुशफिकुर रहीमने सर्वाधिक ३८ धावा केल्या. ग्रीव्सने दोन विकेट घेतल्या.

वाचा- वर्ल्डकपसाठी तयारी झाली का? आज कळणार टीम इंडियाची ताकद

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी ६ चेंडूत २४ धावांची गरज होती. तर अखेरच्या ३ चेंडूवर १८ धावा हव्या होत्या. पण बांगलादेशचा फलंदाज मेहंदी हसनला ३ चेंडूत ४,६ आणि १ अशी धाव घेता आली.

वाचा- किंग इज बॅक; कोणाला वाटले नव्हते तो पुन्हा येईल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारतावर काय होणार परिणाम

या सामन्यात बांगलादेशचा पराभव झाल्याने त्यांना ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान मिळवणे अवघड आहे. जर स्कॉटलंडने पापुआ न्यू गिनी आणि ओमान विरुद्ध विजय मिळवल्यास ते ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवतील. या ग्रुपमधील अव्वल संघ सुपर १२ मध्ये भारताच्या ग्रुपमध्ये येईल. अशा स्थितीत बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ग्रुप ए मध्ये जाईल.

वाचा- भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या युवराजला अटक; पाहा कोणची चूक केली होती

काल (रविवारी) झालेल्या पात्रता फेरीतील ओमानने न्यू गिनीचा १० विकेटनी पराभव केला. तर दुसऱ्या लढतीत स्कॉटलंडने विजय मिळवला. पात्रता फेरीत आज ग्रुप ए मधील आयर्लंड विरुद्ध नेदरलँड तर श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांची मॅच होणार आहे.

वाचा- Video: कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: