अनुभवाने शिकवलं वागायचे कसं
अनुभवाने शिकवलं वागायचे कसं
How to behave taught by experience
गरीबीने शिकवलं सोसायचे कसं
श्रमाने शिकवलं मोठं व्हायचे कसं१!!
अर्धेपोटी जगण्यानें समजावंल
शिक्षण अमृत कसं
प्रगतीने प्रमाणित केलं,
शिक्षण हेच अमृत कसं !!२!!
कोणी काही म्हणो
गरीबी शिकवते जगायचं कसं
कोणी वंदो वा निंदो
अनुभवाने शिकवलं वागायचे कसं!! ३!!
शिक्षणाने शिकवलं
सर्वांत बलवान व्हायचे कसं
संस्कारानें पटवून दिलं
सर्वांना जोड़ायांच कसं !!४!!
चांगल्या माणसाचे संगतीने
शिकवलं चांगल व्हायचे कसं
विकार विकृतिला त्यागुन वागायचं कसं !!५!!
ज्ञानाने शिकवलं आहे
त्यांत यश निर्माण करायच कसं
परिस्थितीने शिकवलं
परिश्रमाने जिंकायच कसं !!६!!
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

"सुप्रभात"
“निसर्गाशी शत्रुत्व नव्हे मित्रत्व हवे ,
नेतृत्व नव्हे कर्तृत्व हवे “!!