मोदी फोन उचलत नाही, बायडन फोन करत नाहीत; इम्रान खान यांच्यावर विरोधी पक्षांची टीका


इस्लामाबाद: पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या प्रमुखांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत वाद झाला असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्ष पीएमएल-एनच्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान खान यांचे परराष्ट्र धोरण फसले असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन उचलत नाहीत, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फोन करत नसल्याचे त्यांनी म्हटले.

मरियम नवाझ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करताना म्हटले की, इम्रान खान यांनी फक्त एकच वचन पूर्ण केले आहे. ते म्हणजे पाकिस्तानच्या जनतेला रडवण्याचे वचन. आज संपूर्ण पाकिस्तानची जनता रडत आहे.

महागाईने जनता त्रस्त; मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!
मरियम नवाझ यांनी भारतासोबतच्या संबंधावर म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या फोनचे उत्तर देत नाहीत आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आतापर्यंत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन केला नाही. अमेरिकन टीव्हीवरदेखील नागरिकांकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांबद्दल टिप्पणी करण्यात आली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना इस्लामाबादच्या महापौरांपेक्षाही कमी अधिकार असल्याचे लोकांनी म्हटले असल्याचे मरियम यांनी म्हटले.

बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले, ‘दुर्गा पूजा मंडपावर हल्ले हा सुनियोजित कट’

पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्ष तीव्र झाला असून आगामी निवडणुकीत इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू खान यांचे निधन
पाकिस्तानला अमेरिकेकडून संपर्काची अपेक्षा आहे. अमेरिकेने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केल्यास आमच्याकडे इतर पर्याय असल्याचे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटले होते. तर, बायडन यांच्या फोनची आपल्याला प्रतिक्षा नसल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: