व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल-बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल होय असे विचार कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम मार्गदर्शन शिबिरात मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पंढरपूर येथे संपन्न झाला याप्रसंगी ते म्हणाले की व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धती ने शरीराची केलेली हालचाल होय शारीरिक तंदुरुस्त असणं आवश्यक आहे.आरोग्य म्हणजे मानसिक,सामाजिक,शारीरिक तयारी असणे शक्ती ने माणुस सदृढ बनतो.नियमित व्यायाम व उत्तम आहार याचा समतोल राखून ठेवता आले पाहिजे.
शारीरिक तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. आरोग्य म्हणजे सामाजिक , शारीरिक, मानसिक तयारी असणे शारीरिक शक्ती ने माणुस सदृढ बनतो.युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असुन व्यायाम जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व्यायाम निसर्गाने दिलेली देणगी असुन नियमित व्यायाम केल्यामुळे मानवी जीवनाची सार्थक होते.युवकांनी व्यायाम करणे जीवनशैली बनवावे तर सदृढ शरीर प्राप्त होईल.
पुढे बोलताना ते म्हणाले नव युवकांना शरीर सौष्ठवतेची तसेच व्यायामाचीआवड निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे त्यापासून दूर व्हावे,सदृढ शरीर व मन बनवावेत यासाठी खास प्रयत्न करावेत.
याप्रसंगी यूटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, केंद्रीय रेल्वे कमिटी संचालक प्रणव परिचारक, अक्षय वाडकर आदींसह मान्यवर तसेच प्रणव परिचारक युवा मंच पंढरपूर-मंगळवेढा व पांडुरंग परिवार युवक आघाडीचे युवा, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.