महागाईशी झुंजणाऱ्या श्रीलंकेसमोर मोठे संकट; भारताकडे मागितली ‘ही’ मदत!


कोलंबो : श्रीलंकेत सध्या महागाई गगनाला भिडली असताना आणखी एक संकट उभे राहिले आहे. श्रीलंकेला परदेशी चलन संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम इंधन खरेदीवर झाला आहे. इंधन खरेदी करण्यासाठी श्रीलंकेने भारताकडे ५० कोटी डॉलरची मदत मागितली आहे. श्रीलंकेतील इंधन साठा जानेवारी महिन्यापर्यंतच राहू शकतो, असा इशारा ऊर्जा मंत्री उदय गम्मनपिला यांनी दिला आहे. भारत, पाकिस्तानप्रमाणेच श्रीलंकेतही इंधन दराचा भडका उडाला आहे.

सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (सीपीसी) अध्यक्ष सुमित विजेसिंघे यांनी एका स्थानिक वृत्तसंकेतस्थळाच्या हवाल्याने सांगितले की, आम्ही सध्या भारत-श्रीलंका आर्थिक भागीदारी कराराच्या अनुषंगाने ५० कोटी अमेरिकन डॉलरचे कर्ज मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांसोबत चर्चा करत आहोत. या कर्जाच्या रक्कमेचा वापर पेट्रोल-डिझेलची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे.

‘या’ देशात महागाईचा आगडोंब; दूधाचा दर प्रतिलिटर ११०० रुपयांवर, गॅस सिलिंडर अडीच हजारांवर!

चीनमधील वीज संकट वर्षभर राहणार?; कोळशाच्या किंमतींनी वाढवली चिंता
श्रीलंकेची सरकारी इंधन कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर (सीपीसी) याआधीच देशातील दोन प्रमुख सरकारी बँका असलेल्या बँक ऑफ सिलोन आणि पीपल्स बँकचे जवळपास ३.३ अब्ज अमेरिकन डॉलरची कर्ज थकबाकी आहे. श्रीलंका आखाती देशांसह सिंगापूर व इतर देशांमधून रिफाइंड उत्पादने आयात करतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: