जोडोनिया कर ; जाणून घ्या मोठे आर्थिक व्यवहार व प्राप्तिकर


सीए संजीव गोखले : भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी लोक विवरणपत्र सादर करतात. यासाठी कराचे दर कमी करणे, विवरणपत्र सोपे करणे, ऑनलाइन सादरीकरण, झटपट परतावा अशा विविध माध्यमांतून प्राप्तिकर खाते व अर्थ मंत्रालय करदात्यांना कर व विवरणपत्र भरण्यासाठी उद्युक्त करत आहे. याशिवाय अघोषित व काळ्या पैशातून मिळवलेली संपत्ती उघडकीस आणण्यासाठी कलम २८५ बीए अंतर्गत ठराविक संस्थांना आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र प्राप्तिकर खात्याला दरवर्षी सादर करणे बंधनकारक केले आहे. यामुळे आपल्या आर्थिक व्यवहारांवर प्राप्तिकर खाते सहजपणे नजर ठेवू शकते.

याप्रमाणे बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, कंपन्या, उपनिबंधक, नोंदणी कार्यालय वगैरे ठराविक मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याला दरवर्षी पुरवतात. त्यातूनच प्राप्तिकर खाते आपल्या फॉर्म २६एएस मध्ये त्या माहितीचा उल्लेख करते.

मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये, कर्जरोख्यांमध्ये किंवा मुदत ठेवींमध्ये १० लाख किंवा अधिक गुंतवणूक, म्युच्युअल फंडातील योजनेत १० लाख किंवा अधिक गुंतवणूक, १० लाख व अधिक विदेशी चलन खरेदी, बचत खात्यात १० लाख व अधिक रोखीने केलेली जमा, चालू खात्यात ५० लाख व अधिक केलेली (रोखीने) जमा किंवा काढलेली रक्कम, ३० लाख रुपये व अधिक अचल मालमत्ता खरेदी किंवा विक्री, एक लाख व अधिक रकमेसाठी क्रेडिट कार्डाचा वापर, १० लाख व अधिक रकमेचे जारी केलेले शेअर्स अशा व्यवहारांची माहिती संबंधित संस्थेने प्राप्तिकर खात्यास पुरवणे बंधनकारक आहे.

चूक सुधारण्याची संधी ; या कारणामुळे इक्विटी फंडात गुंतवणूकदारांचे अडकलेत २ लाख कोटी
करदात्याने या माहितीचा संबंध उत्पन्नाशी असेल तर ते आपल्या विवरणपत्रात दाखवणे जरुरी आहे. उदाहरणार्थ, जर १० लाखांपेक्षा अधिक रकमेची मुदतठेव बँकेत असेल तर हे पैसे कोणत्या स्त्रोतातून मिळाले व यावरील व्याज याचा विचार करदात्याने विवरणपत्र भरताना केला पाहिजे. जर मोठी मालमत्ता खरेदी केली असेल तर पैसे कुठून आले याचा हिशेब ठेवावा. जर एखादे घर विकून पैसे उभे केले असतील तर भांडवली नफा झाला आहे का? तो विवरणपत्रात दाखवला आहे का याची काळजी घेणे आवश्यक आहे.

भाव कमी, खरेदी जोरात ; सहामाहीत सोने आयात तब्बल चार पटीने वाढली
थोडक्यात, अशी माहिती करदात्याला सावध करते व योग्य विवरणपत्र भरण्यास मदत करते. आपल्या व्यवहारावर सरकारचे लक्ष आहे हे निदर्शनास आणून देते. त्यामुळे प्रत्येक करदात्याने विवरणपत्र भरण्याअगोदर फॉर्म २६एस तपासून पाहावा व त्याप्रमाणे विवरणपत्र सादर करावे.

जीडीपीत होणार सुधारणा; ‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला
काही वेळा संबंधित संस्था आपण न केलेले आर्थिक व्यवहार आपल्या पॅनवर झाले असे कळवते. अशा वेळी करदात्याने संबधित संस्थेला पत्र पाठवून व पोचपावती घेऊन सुचित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाच आर्थिक व्यवहाराची नोंद दोनदा झालेली कधी कधी पाहायला मिळते. अशा वेळीही करदात्याने लेखी सूचना देणे आवश्यक आहे. प्राप्तिकर खात्याने विचारणा केली तर व्यवहाराची योग्य माहिती देणेही जरुरीचे आहे. ऑनलाइन उत्तर देताना मी व्यवहार केला नाही हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे.

पैशांची गरज आहे? या दोन बचत योजनांवर मिळेल तुम्हाला कर्ज, जाणून घ्या सविस्तर
या सगळ्यातून प्रामाणिक करदात्याला उत्तेजन मिळून करचोरी करणाऱ्याला शासन करणे सोपे झाले आहे. व्याज, दंड टाळण्यासाठी प्रत्येक करदात्याने आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती योग्य पद्धतीने देणे आवश्यक आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: