colin powell dies : अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचे निधन


वॉशिंग्टनः अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचे निधन ( colin powell dies ) झाले. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. कॉलिन पॉवेल हे परराष्ट्रमंत्र्यांव्यतिरिक्त जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्षही होते. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. कॉलिन पॉवेल यांच्या कुटुंबाने फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. ‘ते आता या जगात नाही. त्यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला होता’, असं पोस्टमधून सांगण्याच आलं आहे. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी अमेरिकेच्या हितासाठी एकापाठोपाठ अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

जमेकाच्या स्थलांतरिताच्या घरी जन्म

कॉलिन पॉवेलचा यांचा जन्म ५ एप्रिल १९३७ ला न्यूयॉर्कच्या हार्लेम येथे जमैकाच्या स्थलांतरिताच्या कुटुंबात झाला. दक्षिण ब्रोंक्समध्ये वाढलेल्या पॉवेल यांनी न्यूयॉर्क शहरातील सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांनी ROTC मध्ये देखील भाग घेतला. अचूक ड्रिल टीमचे नेतृत्व देखील केले. त्यांना कॅडेट कॉर्प्सने कर्नलचा दर्जाही दिला होता.

अमेरिकेत कामगारांचा एल्गार; कारखान्यांपासून ते हॉलिवूड स्टुडिओपर्यंत संपाची धग

पदवीनंतर ते अमेरिकन सैन्यात झाले भरती

१९५८ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकन सैन्यात भरती झाले. यानंतर त्यांनी १९६० च्या दशकात दक्षिण व्हिएतनाममध्ये सेवा केली. सेवेदरम्यान ते दोनदा जखमीही झाले होते. त्यांना १९७९ मध्ये ब्रिगेडियर जनरल पदावर बढती मिळाली. अमेरिकेच्या इतिहासातील पहिले श्वेत परराष्ट्र मंत्री बनून कॉलिन पॉवेल यांनी इतिहास रचला होता.

मोदी फोन उचलत नाही, बायडन फोन करत नाहीत; इम्रान खान यांच्यावर विरोधी पक्षांची टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: