धक्कादायक! पुण्यात राहत्या घरी तरुणाचा गळा चिरून खून


Authored by | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 19, 2021, 9:21 AM

हडपसर येथे एका २३ वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरात गळा चिरून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे. (Youth Found Dead in Hadapsar home)

 

पोलीस

हायलाइट्स:

  • पुण्यातील हडपसरमध्ये तरुणाचा खून
  • राहत्या घरी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
  • मोठा भाऊ ताब्यात, पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू

पुणे-सोलापूर रोडवर हडपसर हद्दीत पंधरा नंबर चौक येथे एका युवकाचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात हा खून झाला असून सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. (Youth Found Dead in Hadapsar home)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. खुनाचं कारण समजू शकलेलं नाही. प्रदीप शिवाजी गवळी (वय २३ रा. पंधरा नंबर, हडपसर) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गवळी हा रिक्षाचालक होता. तो त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pune: youth found dead in his home in hadapsar
Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: