आर्यन खान अटक प्रकरण : ‘एनसीबी’ विरोधात शिवसेना न्यायालयात


हायलाइट्स:

  • शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
  • एनसीबी अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, शिवसेनेची मागणी
  • सेलिब्रिटींना जाणून-बुजून लक्ष्य करण्यात आल्याचा दावा

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबई विभागीय कार्यालय आणि तेथील अधिकाऱ्यांची आर्यन खान प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन होत आहे, याची न्यायालयाने एनसीबीशी संबंधित घडामोडींची स्वाधिकारात (स्यू मोटो) दखल घ्यावी. त्याला बदहेतूने अटक करण्यात आली आहे. याच पद्धतीने चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटी आणि मॉडेल यांना लक्ष्य करून गेल्या दोन वर्षांत कारवाई करण्यात आली. यात एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी न्यायालयामार्फत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी याचिकेद्वारे केली आहे.

तुरुंगात वाढवली आर्यन खानची सुरक्षा, स्पेशल बॅरकमध्ये केलं शिफ्ट
‘मी चांगला माणूस होईन, गरीबांची मदत करेन!’ आर्यन खानने दिले समीर वानखेडेंना वचन
आर्यनचे समुपदेशन कधी केले?

दरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानचे समुपदेशन कधी केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केली.

एनसीबीने आर्यन खानचे समुपदेशन तुरुंगात केले का, अशी विचारणा करून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे देशातील ख्यातनाम वकील हरीश साळवे बोलत आहेत. त्यामुळेच संबंधित यंत्रणेकडून आता अशा सकारात्मक गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.

यावेळी, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली हे ठीक आहे. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी’ असा टोला मलिक यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.

aryan khan drug case : आर्यन खानचं नाव न घेता ओवैसी म्हणाले, ‘मी गरीब मुस्लिमांबद्दल बोलेन…’
Aryan Khan: आर्यनच्या जामिनास NCBचा विरोध; गांधीतत्वांचा उल्लेख करत अनिल सिंग म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: