पंढरपुरात कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी

पंढरपुरात कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी
Inspection of Corona patient bills at Pandharpur
6 पथकांमार्फत 339 बिले तपासली, 4 लाख 82 हजार रुपये केले कमी
 पंढरपूर - पंढरपूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी तालुक्यात शहर व ग्रामीणमध्ये 14  खाजगी रुग्णालयांना प्रशासनाने कोविड

हॉस्पिटल चालविण्यास परवानगी दिली आहे. या हॉस्पिटलमधून मिळणार्‍या बिलाबाबत अनेक तक्रारी येत आहेत.या तक्रारींची दखल घेवून शासन नियमाच्या आधिन राहुन रुग्णालयांमध्ये आकरण्यात येणार्‍या 339 बिलांची 6 पथका मार्फत तपासणी करण्यात आली. यात 4 लाख 82 हजार 200 रुपये बिलातून कमी करण्यात आले आहेत.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात 14 खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात.खाजगी रुग्णालयां कडून आकारण्यात येणार्‍या बिलांचे शासन निर्णयानुसार लेखापरिक्षण करण्यात येत आहे.  खाजगी रुग्णालयामधील बिलांची तपासणी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशील बेल्हेकर यांच्या नेत्वृवाखाली 6 पथकांची टिमने केली. यावेळी 339 बिलाची तपासणी केली. या टिममध्ये उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते, सहाय्यक निबंधक एस.एम.तांदळे हे देखील कार्य करत आहेत.

  पंढरपूर शहरामधील गॅलक्सी,लाईफलाईन,श्री गणपती, जनकल्याण, अ‍ॅपेक्स ,श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडीसिटी,ऑक्सिजन पोलीस,  पडळकर,विठ्ठल,डिव्हीपी तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या खाजगी 14 खाजगी

रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील बीले पथकानी तपासली असून जादा बीले आकरण्यात आल्याने तब्बल 4 लाख 82 हजार 200 रुपये कमी करण्यात आले आहेत.यापुढील काळातही नियमतिपणे बीले तपासली जाणार आहेत. अतिरिक्त रक्कम आढळून आल्यास ती कमी करण्यात येणार असल्याचे पथकाने सांगितले आहे.

    या संबधित हॉस्पिटलबाबत ज्या कोणाला बिलांबाबत शाशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.तसेच बिलांबाबत लिखित स्वरुपात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: