करोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी राजेश टोपे म्हणाले, अजूनही…


हायलाइट्स:

  • राजेश टोपे यांनी घेतली नाशिकमध्ये पत्रकार परिषद
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी केलं सावध वक्तव्य
  • ‘मिशन कवचकुंडल’ला दिवाळीपर्यंत मुदतवाढ

नाशिक: ‘करोनाची (Coronavirus) तिसरी लाट येण्यासारखी परिस्थिती राज्यात सध्या तरी नाही. करोना कुठलाही नवा व्हेरिएंट आढळून आलेला नाही ही जमेची बाजू आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट १०० टक्के संपलेली नाही,’ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज स्पष्ट केलं.

नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील करोना संसर्गाची स्थिती, लसीकरणाची आकडेवारी व संभाव्य परिस्थितीचीही टोपे यांनी यावेळी माहिती दिली. ‘राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी लसीकरण महत्त्वाचं आहे. लसीकरण झाल्यास भीती राहणार नाही. राज्यात आतापर्यंत ७० टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, ३५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दोन्ही प्रकारच्या लोकांचं मिळून ९ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ हा कार्यक्रम दिवाळीपर्यंत राबवला जाणार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.

वाचा: रामदास कदम यांना आणखी एक धक्का; आमदारकीची संधी पुन्हा नाही?

महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण हे एक मोठं आव्हान आहे. लसीकरणासाठी लोकांनी स्वत: पुढं यावं असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं. मुंबईत ८५ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. दोन चार महिन्यांत संसर्गाचा दर बराच कमी झालाय. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मागील काही दिवसांत करोनाचा एकही मृत्यू नाही ही मोठी गोष्ट आहे,’ असं टोपे म्हणाले. ‘जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसायसुरू करायला परवानगी दिली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाही!

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना यापुढं मुदतवाढ मिळणार नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर एक वर्षाचं एक्स्टेन्शन देण्यात आलं होतं. आता ते मिळणार नाही. निवृत्तीचे वय ६० वर्षेच राहील. तरुण वर्गाला पुढं आणायचं आहे, त्यांना संधी द्यायची आहे,’ असं टोपे यांनी याबाबत बोलताना सांगितलं.

वाचा: विश्वास ठेवावा तर असा! दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नावSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: