uttarakhand flood : उत्तराखंडमध्ये कहर! पावसाने पूर आणि भूस्खलनात ४१ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
उत्तराखंडमध्ये पावसामुळे भूस्खलन होऊन एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ६ जणांचा मृत्यू हा सोमवारी झाला होता. नैनीताल विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिाकणी भूस्खलन होऊन अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. नैनीतालमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नैनीतालचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक कुमार जोशी यांनी दिली. तर भूस्खलनाच्या घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा प्रचंड ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनातील अधिकारी प्रदीप जैन यांनी दिली.
अल्मोडा जिल्ह्यात एका घरावर दरड कोसळली. या घटनेत ढिगाऱ्या खाली दबून ५ जणांचा मृत्यू झाला. दोन जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये सोमवारी ६ जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये पावसामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. तसंच पीडित कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.
uttarakhand rain : देवभूमीत तांडव! उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने २२ जणांचा मृत्यू
आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये सोमवारी १६ इंच पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. दरम्यान, उत्तराखंडच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने मंगळवारी दिला आहे.