gang rape on minor girl : धक्कादायक! वडील-भावाला कोंडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


भरतपूरः राजस्थानच्या भरतपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरतपूर जिल्ह्यातील एका गावातील एका व्यक्तीने ५ जणांविरोधात गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा या ५ जणांनी आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपल्याला आणि आपल्या मुलाला घटनेवेळी घरात कोंडलं आणि त्यानंतर आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित पित्याने केला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी आपल्या शेतातील पिक पेट्रोल टाकून जाळून टाकले, असाही आरोप पीडित वडिलांनी केला आहे.

पोलिसात तक्रार दाखल

गावातील ५ गुडांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तसंच आपल्या शेतातील पिकांना आग लावली, अशी तक्रार एका व्यक्तीने केल्याचं तपास अधिकारी अनिल मीणा यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या दोन्ही पक्षांवर यापूर्वी भांडण आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत, असं त्यांनी सांगितलं.

2 girls run over by vehicle : पोलीस अधिकाऱ्याने दोन तरुणींना चिरडलं, १ ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत

१७ ऑक्टोबरच्या रात्री घडली घटना

ही घटना १७ ऑक्टोबरच्या रात्री घडली. पीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. तसंच पीडित कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली जात आहे. आरोपींचाही शोध घेतला आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

UP Crime: दिवसाढवळ्या न्यायालय परिसरातच गोळ्या घालून वकिलाची हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: