T20 World Cup: भारताविरुद्ध काय असेल पाकिस्तानची रणनिती; झाला मोठा खुलासा


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात मोठी लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीची प्रतिक्षा सर्वांना आहे. या लढतीची चर्चा आतापासून सोशल मीडियावर सुरू आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या या हाय व्होल्टेज लढतीत पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हन तयार केल्याचे वृत्त आहे.

वाचा- विराटची मोठी डोकेदुखी गेली; पाकिस्तानविरुद्ध ही जोडी उतरणार सलामीला

पाकिस्तान संघाने सीनिअर आणि युवा खेळाडूंचा संघात समावेश केल्याचे वृत्त जिओ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पाकिस्तान संघाने भारताविरुद्धच्या ब्लॉकबस्टर लढतीसाठी अनुभवी खेळाडूंसह ११ जणांची निवड केली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. जर एखाद्या खेळाडूच्या फिटनेस संदर्भात काही प्रश्न तयार झाला तर पाकिस्तान भारताविरुद्ध तोच संघ मैदानात उतरवणार जो सध्या सराव सामने खेळत आहे.

वाचा- सराव सामना पडला महागात; टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बसला मोठा झटका

कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवान, फखर जमा, मोहम्मद हफीज, शोएब मलिक आणि आसिफ अली हे अंतिम ११ मध्ये असतील. जलद गोलंदाज शाहीन शाह आफरीदीस, हसन अली आणि हरिस रउफ यांचा देखील अंतिम ११ मध्ये समावेश असेल, असे वृत्त जिओने दिले आहे. ऑलराउंडरमध्ये शादाब खान आणि इमाद वासीम यांचा स्थान मिळू शकते. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात हा संघ मैदानात उतरवला होता.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहास घडला; आजवर कोणालाही जमला नाही हा विक्रम

भारताविरुद्धच्या सामन्यात असा असेल पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमा, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शाहीन आफरीदी, हसन अली, हारिस रउफ, शादाब खान आणि इमाद वसीम

वाचा-टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या संघावर धक्कादायक आरोप; भारताला घाबरून पराभूत झाले

असा आहे पाकिस्तानचा प्लॅन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत संध्याकाळी सुरू होणार आहे. या सामन्यात दवाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या गोष्टीचा विचार करून पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने अंतिम ११ निवडण्याचे ठरवले आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तानने पहिल्या सराव लढतीत वेस्ट इंडिजचा ७ विकेटनी पराभव केला. तर भारताने देखील पहिल्या सराव लढतीत इंग्लंडचा सात विकेटनी पराभव केलाय. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला फक्त १३० धावा रोखले आणि विजयाचे लक्ष्य सहज पार केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: