आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल गोव्याला जाण्यासाठी अनिवार्य

आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल गोव्याला जाण्यासाठी अनिवार्य

पणजी,12/05/2021, (हिंदुस्थान समाचार) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी असून गोवा सरकारनेही नुकताच नवीन आदेश जारी केला आहे. आता गोव्याला जायचं असेल तर आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल स्वतःजवळ बाळगणं आवश्यक आहे. त्याशिवाय गोव्यात प्रवेश करता येणार नसल्याचे गोवा प्रशासनाने जाहीर केले आहे.

मात्र हे नियम गोव्याच्या रहिवाशांसाठी लागू असणार नाहीत.गोवा रहिवाशी हे वास्तव्याचा दाखला देऊन गोवा राज्यात प्रवेश करू शकतात. तसेच एखाद्या कामानिमित्त गोव्यात जायचे असेल तर संबंधित कार्यालयाचे पत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे. मेडिकल इमर्जन्सीमध्ये मात्र या प्रमाणपत्राची गरज असणार नाही, असे गोवा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे नियम रस्ते आणि रेल्वे मार्गाकरिता लागू करण्यात आले आहेत.
गोव्याला जाण्यासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य RT-PCR negative report mandatory for going to Goa

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: