Taslima Nasreen : बांगलादेश ‘जिहादीस्तान’ बनलाय – तस्लिमा नसरिन


वृत्तसंस्था, दिल्ली :

‘बांगलादेशातील मदरशांमधून मूलतत्त्ववाद फोफावत असून, या देशाचे रूपांतर आता जिहादीस्तानात झाले आहे,’ अशा शब्दांत प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी संताप व्यक्त केला आहे. शेख हसिना सरकार स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

बांगलादेशातील हिंदू समाजाविरोधात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना तस्लिमा यांनी बांगलादेशमधील हिंदू आणि बुद्धधर्मीय तिसऱ्या वर्गाचे नागरिक ठरले असल्याचे सांगून वाढती हिंदूविरोधी मानसिकता ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला. मुस्लिमविरोधी भूमिका मांडल्यामुळे मूलतत्त्ववादी गटाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्याने तस्लिमा यांना १९९४मध्ये बांगलादेश सोडावा लागला होता.

lakhimpur kheri incident : लखीमपूरप्रकरणी यूपी पोलिसांनी जारी केले फोटो, ओळख सांगणाऱ्यांना बक्षीस
priyanka gandhi : यूपी विधानसभा निवडणूक लढवणार का? प्रियांका गांधींचे सूचक विधान

हिंदूविरोधी भावना ही बांगलादेशात नवीन नाही, असे असूनही दुर्गा पुजेदरम्यान हिंदूंना संरक्षण न दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘प्रत्येक वर्षी दुर्गा पूजेदरम्यान हिंदूंवर ‘जिहादी’ हल्ला होण्याची शक्यता असते, हे शेख हसिना यांना चांगलेच माहीत आहे. तरीही हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण का देण्यात आले नाही. जर सरकारला त्यांचे संरक्षण करायचेच असते, तर त्यांनी ते केले असते,’ असेही त्या म्हणाल्या.

कारवाईचे आदेश

धर्माचा वापर करून हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी गृहमंत्र्यांना दिले. सोशल मीडियावरील कोणत्याही बाबीची शहानिशा केल्याशिवाय, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Asaduddin Owaisi: आमचे जवान शहीद होताना तुम्ही टी-२० खेळवणार?, ओवैसींचा भाजप सरकारला प्रश्न
Satya Pal Malik: ‘…तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही’, सत्यपाल मलिक यांच्यामुळे भाजपच्या डोकेदुखीत वाढ?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: