LIC ने करोडो ग्राहकांना पाठवले SMS; लवकर करा हे काम


नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Inurance Corporation of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक संदेश (SMS) पाठवला आहे. एलआयसीने ग्राहकांना पाठवलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, पीएमएलएनुसार, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्यांची एलआयसी पॉलिसीसोबत पॅन जोडावे.

आजकाल अनेक महत्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डशी जोडली जात आहेत. आता एलआयसीनेही पॅन लिंक करण्यास सांगितले आहे. एलआयसीने म्हटले आहे की, पॅन पॉलिसीशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. पॅन कार्डला एलआयसी पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

तुमच्या पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी www.licindia.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. एलआयसीने यासाठी ३ टप्पे दिले आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी जोडणे सोपे होईल.

– एलआयसीच्या संकेतस्थळावर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील प्रदान करा. तुमचा मोबाईल नंबर टाका.
– त्या मोबाइल क्रमांकावर एलआयसीकडून एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
– फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला यशस्वी नोंदणी विनंतीचा संदेश मिळेल. हे दर्शवेल की, तुमचे पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडलेले आहे.

जर तुमची एलआयसी परिपक्व (मॅच्युर) होणार असेल किंवा पॉलिसीवर कर्ज किंवा प्री विड्रॉल (पैसे काढायचे) असतील, तर तुम्हाला तुमचे पॅन पॉलिसीशी जोडणे आवश्यक आहे. एलआयसी आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते. जर तुमची रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल, तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येईल. हा त्रास टाळण्यासाठी तुमची पॉलिसी आजच पॅनशी जोडा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: