करकंबमध्ये करण्यात आला गौरव आरोग्य सेवकांचा

करकंबमध्ये करण्यात आला गौरव आरोग्य सेवकांचा

करकंब /मनोज पवार – करकंब वडार भवन, तालुका पंढरपूर येथे मंगळवार दि १९/१०/२०२१ रोजी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची अहोरात्र सेवा करणारे करकंब ग्रामीण रुग्णालयातील डॉ तुषार सरवदे,डॉ दांडेकर , सूर्यकांत कुरणावळ, बापू गायकवाड, रवी परमार, सुनील नवगिरे व रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच करकंबमधील सर्व आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता देशपांडे यांच्या सत्काराचे आयोजन मनसेच्यावतीने करण्यात आले होते.

 यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे,बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे, लक्षमण वंजारी,सिंहगड कॉलेजचे बडेकर सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तुषार सरोदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचे कौतुक करत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून त्या सर्वांचा सत्कार केला.

      मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांचे आभार मानले . मनसे जिल्हाउपाध्यक्ष महेंद्र पवार सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून यापुढेही त्यांनी अशाच प्रकारचे सामाजिक कार्य चालू ठेवावे असे मनोगत व्यक्त केले.

      याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, बाबू वागस्कर, मनसे पुणे शहर महिला अध्यक्षा वनीता वागस्कर, माजी डी वाय एस पी रघुनाथ जाधव, मनसे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, मनसे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, मनसे पंढरपूर तालुकाउपाध्यक्ष संजय गायकवाड, करकंब शहराध्यक्ष बालाजी पवार, सिंहगड कॉलेजचे बडेकर सर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे ,पंढरपूर तालुका मनसे विद्यार्थी संघटना अध्यक्ष सचिन माळी यांच्यासह सर्व  पदाधिकारी,मनसे सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: