करकंब तालुका पंढरपूर येथे मनसे शाखांचे उद्घाटन

करकंब तालुका पंढरपूर येथे मनसे शाखांचे उद्घाटन
 करकंब - करकंब शहरातील सर्वच प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 शाखांचे उद्घाटन मनसे नेते शँडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यामध्ये इंदिरा नगर शाखा अध्यक्ष रोहित धोत्रे, मेकॅनिकल चौक शाखाध्यक्ष सतीश सोनकांबळे , सोमवार पेठ शाखाध्यक्ष अमोल धांडे,थोरली वेस शाखाध्यक्ष प्रशांत मदने,धाकटी वेस शाखाध्यक्ष प्रथमेश नलवडे,शुक्रवार पेठ शाखाध्यक्ष सोनू पवार,कोरबू वस्ती शाखाध्यक्ष सलीम शेख, मोडनिंब रोड शाखाध्यक्ष बाजीराव धोत्रे ,पंढरपूर चौक शाखाध्यक्ष किरण वंजारी अशा आहेत. 

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी केले होते.यावेळी पुणे महिला शहराध्यक्षा वनीताताई वागस्कर,पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटिल,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुकाध्यक्ष संजय गायकवाड, गौरव शिंदे,उपजिल्हा अध्यक्ष माढा बाळासाहेब टोणपे,माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरे, सागर बंदपट्टे,सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, हेमंत पवार,धनाजी चव्हाण,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सचिन माळी,शहराध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष समीर कोरबू, राम धोत्रे,समाजसेविका देशपांडे मॅडम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: