माय नेम इज टुडे – गोफणगुंडा
माय नेम इज टुडे
येथे फक्त गुंडच जिंकतात सत्याग्रही हरतात
म्हणून राजकीय खळयावर गुंडच खेळतात !!१!!
उमेदवारी देतांना जिंकेल त्याचाच विचार करतात !
सद्गुण सेवा गुण यांचा पंचनामा करतात !!२!!
राजकारणात गुनवंत नव्हे धनवान प्रभावी ठरतात
इतरांना ज़रूरी पुरता उतारा एवढेच मानतात!!३!!
निवडून येणारा कौतुकास्पद ठरतो
सत्यासाठी लढणारा मात्र शून्यव्रत ठरतो !!४!!
आता राजकारणात कोण शुद्ध शहाजुक आहे?
कोणत्याही पक्षांत जा सारेच वादग्रस्त आहेत!!५!!
सत्तेच्या राजकारणात गुन्हेगार पूजले जात आहेत
हे पाहून महात्मे देखील ढसाढसा अश्रू ढाळत आहेत !!६!!
"सुप्रभात"
“कोणीही कितीही अडथळे वा गतिरोधक निर्माण केलें तरी श्रम,सत्य,तत्व अन सत्व यांस यश प्राप्त होतेच “
आनंद कोठडीया,जेऊर, ता.करमाळा
९४०४६९२२००
