पुण्याला तब्बल ८ महिन्यांनंतर मोठा दिलासा; आज एकाही करोना रुग्णाचा मृत्यू नाही!


हायलाइट्स:

  • पुणे शहराला मोठा दिलासा
  • शहरात एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
  • तब्बल ८ महिन्यानंतर दिलासादायक चित्र

पुणे : करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने पुणे शहरात थैमान घातलं होतं. या काळात शहरातील अनेक नागरिकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र आता जवळपास ८ महिन्यानंतर पुणे शहराला (Pune Coronavirus News) मोठा दिलासा मिळाला असून आज शहरात एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

‘पुणे मनपा हद्दीत करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्यूसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेलं आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे,’ असं मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी; उद्या स्वीकारणार पदभार

पुणे शहरात काय आहे स्थिती?

पुणे शहरात आज ११६ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. शहरात आतापर्यंत एकूण ५ लाख १९ हजार ९३३ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर शहरातील ९ हजार १९० रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील करोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचं चित्र आहे. शहरात मंगळवारी ११२ नवे रुग्ण आढळले होते, तर २ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी ७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि एका रुग्णाला करोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील इतर शहरांतील करोना प्रादुर्भावही आटोक्यात येत आहे. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्या राज्यभरात २ हजारांपेक्षा कमी आढळत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: