pm modi interacts with top oil and gas ceos : पेट्रोल-डिझेलची दरवाढ; PM मोदींची तेल कंपन्यांच्या CEOs सोबत बैठक, अंबानींची उपस्थिती


नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील तज्ज्ञांशी ( pm modi interacts with top oil and gas ceos ) संवाद साधला. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, रोझनेफ्ट (रशिया) चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इगोर सेचिन आणि सौदी अराम्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासेर यांच्यासह इतर जण उपस्थित होते.

२०१६ पासून सुरू झालेला हा सहावा वार्षिक संवाद आहे. यात तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक नेत्यांचा समावेश आहे. जे या क्षेत्रातील प्रमुख मुद्द्यांवर विचार करतात आणि भारताबरोबर सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेतात, असं पीएमओने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा ३५ पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे देशभरात इंधनाच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर १०६.१९ रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत ११२.११ रुपये प्रतिलिटर उच्चांक गाठला आहे.

मुंबईत डिझेलचा दर आता १०२.८९ रुपये प्रतिलिटर आहे. तर दिल्लीत ९४.९२ रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या दोन दिवसांत दरांमध्ये कुठलीही वाढ झाली नव्हती. त्यापूर्वी सलग चार दिवस रोज ३५ पैसे प्रतिलिटरने दर वाढवले गेले.

Uttar Pradesh: २६० कोटींच्या कुशीनगर विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, श्रीलंकन बौद्ध भिक्खूंची हजरी

आंतरराष्ट्रीय बाजारात ७ वर्षांत प्रथमच बुधवारी कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाचे व्यवहार ८४.४३ डॉलर प्रति बॅरलवर सुरू आहेत. एक महिन्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर ७३.९२ डॉलर प्रति बॅरल इतकी होती. कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय किंमतींच्या समान ठेवले जातात.

amit shah meets pm modi : अमित शहा पंतप्रधान मोदींना भेटले, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झाली महत्त्वाची चSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: