lakhimpur kheri violence : सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारची काढली खरडपट्टी, ‘स्टेटस रिपोर्टची रात्री उशिरापर्यंत वाट बघितली’


नवी दिल्लीःलखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ( lakhimpur kheri violence ) झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. यूपी सरकारने सद्यस्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) दाखल करण्यात विलंब केला, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारला फटकारलं आहे. आम्ही काल रात्री एक वाजेपर्यंत स्टेटस रिपोर्टची वाट पाहत राहिलो. पण आम्हाला अहवाल आता प्राप्त झाला आहे, असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना म्हणाले. सरन्यायाधी रमन्ना यांनी सुनावणीवेळी आपल्या जुन्या आदेशाचा संदर्भ दिला. आम्हाला किमान १ दिवस आधी स्टेटस रिपोर्ट मिळायला हवा, हे गेल्या सुनावणीवेळी आम्ही स्पष्टपणे सांगितले होते, असं सरन्यायाधीश म्हणाले.

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी यूपी सरकारच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारले. राज्य सरकारतर्फे वकील हरीश साळवे यांनी बंद कव्हरमध्ये अहवाल दाखल केला. आम्ही या प्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत स्टेटस रिपोर्टची वाट पाहत राहिलो, असं सरन्यायाधी यावेळी हरीश साळवे यांना म्हणाले.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या प्रकरणी सुनावणी केली. सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांचा या पीठात समावेश आहे. उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणातून पळ काढत असल्याचं दिसतंय. यामुळे आपली प्रतिमा बदला, असं न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या. हे प्रकरण न संपणाऱ्या कथेसारखं होऊन नये, असं निरीक्षणही पीठाने नोंदवलं.

lakhimpur kheri incident : लखीमपूरप्रकरणी यूपी पोलिसांनी जारी केले फोटो, ओळख सांगणाऱ्यांना ब

कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रश्न-उत्तरे

साळवे- सुनावणी शुक्रवारी ठेवा

सरन्यायाधीश- आम्ही सुनावणी पुढे ढकलणार नाही.

सरन्यायाधीश- ४४ साक्षीदार आहेत. आणि फक्त ४ जणांचे जबाब नोंदवले आहेत. बाकीच्या साक्षीदारांचे जबाब का नाही घेतले?

साळवे- प्रक्रिया सुरू आहे.

लखीमपूर खीरी हिंसाचार : भाजप नेता सुमित जयस्वालसहीत चार जणांना अटक

सरन्यायाधीश- किती आरोपी आहेत?

साळवे- आतापर्यंत १० आरोपी आहेत. यानंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी अवघड आहे. त्यात शेतकरी होते.

सरन्यायाधीश- आम्ही दोन्ही प्रकरणं वेगळी करू. पण कारने चिरडल्याच्या घटनेत किती जणांना अटक झाली?

साळवे- १० जणांना अटक झाली आहे.

सरन्यायाधीश- किती जण पोलीस कोठडीत आणि किती न्यायालयीन कोठडीत आहेत?

न्यायमूर्ती सूर्यकांत- जे न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यांच्या पोलीस कोठडीसाठी फारसे प्रयत्न केले गेले नाहीत, असं तर नाही ना?

यूपीच्या वकील गरिमा प्रसाद- घटना कशी घडली? हे घटनास्थळी जाऊन तपासलं गेलं आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत- हे ठीक आहे. पण दंडाधिकाऱ्यांसमोर साक्षीदारांचे जबाब कलम १६४ नुसार नोंदणं गरजेचं आहे.

साळवे- आम्हाला एक आठवडा द्या. त्याचे परिणाम नक्कीच मिळतील.

सरन्यायाधीश- साक्षीदारांना सुरक्षाही पुरवा. आता २६ ऑक्टोबरला या प्रकरणी सुनावणी होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: