शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन महिलांवर सामूहिक बलात्कार


हायलाइट्स:

  • दरोडेखोरांच्या टोळीचा शेतवस्तीवर धुमाकूळ
  • पुरुषांचे हातपाय बांधून दोन महिलांवर सामूहिक बलात्कार
  • जिल्ह्यात उडाली खळबळ

औरंगाबाद : दुचाकीवरून आलेल्या सात दरोडेखोरांच्या टोळीने शेतवस्तीवर धुमाकूळ घालत वस्तीवरील पुरुषांचे हातपाय बांधून दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री बिडकीन (ता. पैठण) शेतवस्तीवर घडली. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितलं, की बिडकीन जवळील तोंडोळी शेतवस्तीत अभयकुमार मगर यांच्या शेतात मजुरीसाठी मध्य प्रदेशामधून आलेले तीन विवाहित जोडपे राहतात. मंगळवारी रात्री शेतातील काम आटोपल्यानंतर ही कुटुंबे झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकींवरून सात सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत पुरुषांना बेदम मारहाण केली. पुरुषांचे मोबाइल हिसकावून घेतले. दोघांचे हातपाय बांधून महिलांना लक्ष्य केले. या नराधम दरोडेखोरांनी दोन विवाहित महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि मोबाइल घेऊन फरार झाले.

संतापजनक! वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेला चोरट्यांना लुटलं

या घटनेची माहिती तोंडोळीत कळताच सरपंच संजय गरड यांनी शेतवस्तीवर जाऊन बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर बिडकीन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक, फिंगरप्रींट तज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने या दरोडेखोरांचा माग काढला असता शेकटा रस्त्यावरील तांबे यांच्या शेतातील हौदावर मोबाइल, कुऱ्हाड, चोरून आणलेले महिलांचे बनावट दागिने व दरोडेखोरांनी बदललेले कपडे फेकून दिल्याचं आढळलं.

या घटनेतील पीडित महिलांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल, पैठणचे पोलीस उपपविभागीय अधिकारी विशाल नेहुल व बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपींना पकडण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: