bofors guns at the tawang : भारताची ‘मुलूखमैदानी तोफ’ अरुणाचलमध्ये LAC वर तैनात, चिन्यांच्या चिंधड्या उडवणार


नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागात बोफोर्स तोफ तैनात करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाख परिसरात चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले आहे. अरुणाचल सीमेवर चिन्यांची वळवळ लक्षात घेता बोफोर्स तोफा तैनात केल्या गेल्या आहेत. चीनकडून कोणत्याही संभाव्य घुसखोरीची शक्यता लक्षात घेता भारतीय जवान सतर्क झाले आहेत आणि सीमेवर पाळत वाढवली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून उभय देशांमधील संघर्ष पाहता भारत आणि चीनचे सैनिक एलएसीवर तैनात आहेत. सैनिकांना मागे घेण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, चीनने एकीकडे चर्चा करत दुसरीकडे सीमेवर १०० हून अधिक अॅडव्हान्स रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. याशिवाय १५५ मिमी कॅलिबर PCL-181 सेल्फ-प्रोपेल्ड हॉवित्झर रॉकेट सिस्टीम देखील चिनी सैन्याने सीमेजवळ तैनात केली आहे.

चिनी सैन्याला एलएसीवर चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानेही एक विशेष ‘प्लान -१९०’ तयार केला आहे. भारतीय लष्कर अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीन सीमेवर या ‘प्लान 190’ वर काम करत आहे. या योजनेअंतर्गत भारतीय लष्कराला ‘आक्रमक’ स्वरूप दिले जात आहे.

चीन सीमेला लागू असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LaC) जवानांचा १९० मिनिटांची खास ड्रील केली जातेय. यात १४ ते १५ हजार फूट उंचीवर जवान १४० मिनिटं शारीरिक व्यायाम करतात. यात पुश-अप आणि मार्शल आर्टचा समावेश आहे. यानंतर ४० मिनिटं आक्रमक वर्तनाचा सराव करावा लागतो. या प्लाननुसार जवानांना सीमेवर अक्रमक बनवण्यात येतंय. शत्रूसी दोन हात करण्याची वेळ आल्यास जवान त्यांच्यावर तुटून पडतील, असं कमांडर ब्रिगेडियर विजय जगताप यांनी सांगितलं. विजय जगताप हे भारतीय लष्कराच्या तवांग-ब्रिगेडचे ज्या ब्रिगेडला कोरिया नावाने ओळखले जाते तिचे कमांडर ब्रिगेडियर आहेत.

एलएसीवरील उंच डोंगरांवर दुसऱ्या जागतिक युद्धासारखे बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये फक्त जवान नाही तर आधुनिक कम्युनिकेशन सेंटर सर्विलन्स रुप आणि आर्टिलरी कमांड सेंटरही असते. आघाडीवर तैनात असलेल्या तोफांना युद्धाच्या स्थितीत इथून कमांड दिली जाते. भारतीय लष्कराने एलएसीवर बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. यासोबतच अमेरिकेकडून अलिकडेच खरेदी केलेल्या अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफ एम-७७७ ही तैनात केली आहे.

India Nepal: भारतीय हद्दीत नेपाळी विमान दाखल, ४०० मीटरपर्यंत आत घुसून माघारी परतलं

तोफांसह भारतीय लष्कराने अॅन्टी एअरक्राफ्ट गनही तैनात केल्या आहेत. स्वीडनकडून ३० ते ४० वर्षांपूर्वी घेतलेल्या एल-७- एडी गन अपग्रेड करून अँटी-ड्रोनचे स्वरुप दिले आहे. या गन्सना ‘ड्रोन किलर’ बनवण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: