Kolhapur Crime: कोल्हापुरात बंटी आणि बबली!; पत्ता विचारण्याचा बहाणा करायचे आणि…


हायलाइट्स:

  • पत्ता विचारण्याचा बहाणा करून दागिने चोरायचे.
  • कोल्हापुरातील बंटी आणि बबली जाळ्यात.
  • पोलिसांनी हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली.

कोल्हापूर: पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलांचे दागिने लुटून मोटारसायकलवरून धूम स्टाइलने पळून जाणाऱ्या ‘बंटी आणि बबली‘ला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दाम्पत्याने तीन ठिकाणी महिलांचे दागिने हिसकावून चोरून नेल्याची कबुली दिली आहे. ( Kolhapur Police Arrested Real Life Bunty And Babli )

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरण: आर्यन खानला कोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

गेल्या आठवड्यात पाडळी खुर्द, शिंगणापूर या ग्रामीण भागासह मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी जवाहरनगर येथे महिलांचे दागिने हिसकावून चोरी करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. चोरी करताना मोटारसायकलवर बसणारा युवक व युवती एखादी दागिने घातलेली महिला हेरून तिला पत्ता विचारायचे. पत्ता विचारत असतानाच गळ्यातील आणि कानातील दागिने हिसकावून मोटारसायकलने पळ काढायचे. गृह पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी करवीर आणि शहर पोलीस उप अधीक्षक कार्यालयाची पथके तयार केली. जवाहरनगर येथे चोरीच्या घटनेत एका विशिष्ट कंपनीची मोटार सायकल वापरल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका बातमीदाराने पोलिसांना या ‘ बंटी आणि बबली ‘ची माहिती दिली.

वाचा: संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र!; ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आणि…

हे दोघे कोल्हापूर सांगली रोडवरून त्यांच्या गावाकडे गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या रस्त्यावर टेहाळणी सुरू केली असता हेर्ले गावाजवळ सरपंच हॉटेलजवळ विशिष्ट कंपनीच्या मोटार सायकलवर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण कोणाची तरी वाट पहात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सोन्याची अंगठी मिळाली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली. अल्फाज आप्पासो जमादार (वय २८, रा. आळते, ता. हातकणंगले) असे त्याने नाव सांगितले. त्यानंतर त्याची पत्नी रुपाली उर्फ जोया जमादार हिला पोलिसांनी अटक केली. दोघांनी शिंगणापूर, पाडळी आणि जवाहरनगर या तीन ठिकाणी माहिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला असून दोघेही कोठडीत आहेत.

वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर; ‘हे’ असेल आव्हानSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: