महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा यातील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – ना.डॅा.नीलम गोऱ्हे

महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा यातील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – ना.डॅा.नीलम गोऱ्हे Punish the woman for licking spit of the umpires.Take immediate action against accused – Dr.Neelam Gorhe
पंचाच्या दबावामुळे जात पंचायतने सध्या माहेरी असलेल्या पिडीत महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा यातील आरोपींना तात्काळ अटक होऊन यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्र्यांना ना.डॅा.नीलम गोऱ्हे यांचे निवेदन
  पुणे,दि.१२ मे २०२१/डॉ अंकिता शहा - जात पंचायतीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.या घटनेविषयी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती ना.डॅा.नीलम गोऱ्हे यांनी निवेदन दिले आहे. अशाच प्रकारची घटना मु.वडगाव पो.पिंजर,ता.बार्शीटाकळी जि.अकोला येथे घडल्याचे समोर आले आहे. पिडीत महिला मु.पो.चहार्डी ता. चोपडा.जि.जळगाव, याविषया बद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदनामार्फत डॅा.नीलम गोऱ्हे यांनी घटनेबद्दल सांगितले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये न्यायालयातुन रितसर घटस्फ़ोट घेतला. पिडीत महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फ़ोट धुडकावून लावला. दरम्यान पिडीत महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुर्नविवाह केला. असा पुर्नविवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारू मटण खाल्ले व पिडीत परिवारास जात बहिष्कृत केले. पिडीत महिलेने पहिल्या नवर्‍यासोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी दि.०९ एप्रिल, २०२१ रोजी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. अशा घटनां सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. 

तसेच जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा. घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क सरंक्षण कक्षाकडे ताबडतोब देऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे.जात पंचायतीच्या केसेचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी दर पंधरा दिवसाला घेतला तर अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी. वरील मुद्द्यांवर त्वरित कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत.याबद्दल गृहमंत्री यांना ना.डॅा.नीलम गोऱ्हे निवेदन देऊन यावर कारवाई व्हावी असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: