Video: धोनीने सूत्रे हाती घेतली; सर्वात आधी घेतली या खेळाडूची शाळा


दुबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासोबत मार्गदर्शक म्हणून महेंद्र सिंह धोनी देखील आहे. बीसीसीआयने मेंटॉर म्हणून त्याची नियुक्ती केली आहे. संघात दाखल झाल्यानंतर धोनीने त्याचे काम सुरू केले. काल (बुधवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात धोनीने भारताचा मुख्य विकेटकीपर ऋषभ पंत याच्याकडून ट्रेनिंग करून घेतली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- एका व्यक्तीमुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले; या खेळाडूने केला मोठा खुलासा

वर्ल्डकपच्या आधी भारताने दोन्ही सराव सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या लढतीत इंग्लंडचा तर दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सुपर-१२ फेरीत भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

मुख्य स्पर्धेला सुरूवात होण्याआधी धोनीने पंतच्या विकेटकिपिंगवर काम सुरू केले आहे. धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी धोनी सीमारेषेबाहेर एक सिंगल विकेट ठेवून पंतकडून सराव करून घेत होता. धोनी त्याला अंडर-आर्म थ्रो करण्याबद्दल सांगत होता.

वाचा- सराव सामना पडला महागात; टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बसला मोठा झटका

वर्ल्डकपमध्ये विकेटकीपर म्हणून पंतची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. युएईमध्ये झालेल्या काही लढतीत फिरकीपटूंना मदत मिळाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विकेटच्या मागे पंत किती अलर्ट आणि चपळ राहतो त्यावर भारताला विकेट मिळतील. पंत आणि धोनी यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. धोनीने त्याला जितका वेळ लो राहता येईल तितके राहण्याचा सल्ला दिला.

जगातील सर्वोत्तम विकेटकिपर अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील आयपीएलमध्ये धोनीचा फिटनेस सर्वांनी पहिला आहे. आता वर्ल्डकपमध्ये धोनीच्या माध्यमातून भारतीय संघ काय कमाल करतो याची उत्सुकता फक्त देशातील नव्हे तर परदेशातील चाहत्यांना लागली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: