अभिजीत पाटील यांनी उभा केला साखर कारखान्यामध्ये देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प
अभिजीत पाटील यांनी उभा केला साखर कारखान्यामध्ये देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प Abhijeet Patil set up first oxygen plant in country in a sugar factory

उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामध्ये केली ऑक्सिजनची निर्मीती

धाराशिव, प्रतिनिधी - कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी असून ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढत खा. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग पुणे यांच्या तांत्रिक साहय्याने ऑक्सिजन निर्मिती करण्याचे धाडस दाखवून रात्र-दिवस काम सुरू ठेऊन अठरा दिवसातच प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले.
त्यामध्ये उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला.
धाराशिव साखर कारखान्यात प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीस आज प्रारंभ झाला असून ऑक्सिजनची शुद्धता तपासणासाठी मुंबईच्या लॅब मधे तीन बबल पाठविण्यात आल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन निर्मिती करुन धाराशिव साखर कारखान्याने साखर कारखानदारीत प्रेरणा घेणारा आर्दश निर्माण केला आहे.
धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे . त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के आली असून शासनस्तरावर शुध्दता तपासणीसाठी ऑक्सिजनचे तीन बबल मुंबई येथील लॅब कडे पाठविण्यात आल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
कोरोना संकटापासून लोकांचे जीव वाचविण्या साठी देशात साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करणारे पहिलेच चेअरमन अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारीत प्रेरणादायी आर्दश निर्माण केला आहे.